दारू हवीय बारामतीत मिळते.. कारण आमच्याकडे कारवाई होत नाही? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 26, 2022

दारू हवीय बारामतीत मिळते.. कारण आमच्याकडे कारवाई होत नाही?

दारू हवीय बारामतीत मिळते.. कारण आमच्याकडे कारवाई होत नाही?                   बारामती:- बारामती शहर व तालुक्यात अवैध दारू खुलेआम मिळते..तेही हॉटेल,ढाबा,तर काहींच्या घरात पहा गटारी अमावस्या आहे आणि तुम्हाला रस्त्यावर दारू पिलेली मंडळी दिसतील ते कुठून दारू पियले हे विचारा तुम्हाला कळेल दारू कुठे मिळते ते, मात्र दारू बंदी आहे असे म्हणून जनजागृती करून जनतेला फसविणे योग्य नाही अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहे महिला भगिणी त्रस्त आहे सांगावे कुणाला सांगितले तरी कारवाई होत नाही, झालीच कारवाई तर ती मूळ मालकाला सोडून कोणी तरी बेवडा उभा करून कारवाई दाखवली जात असल्याचे बोलले जात आहे, उत्पादन शुल्क विभाग मात्र शांत आहे कोणतीच कारवाई नाही, की कार्यालय बंद असतात कारण सांगितले जाते कर्मचारी स्टाफ कमी आहे हे नेहमीचे उत्तर ऐकण्याची सवय येथील नागरिकांना झाली आहे, वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नेमकं चाललंय काय हे कळत नाही,अवैध दारू विकणार्याचे सद्या जोरात चाललंय .दारूचे दुकान बंद असली तरी पाठीमागील बाजूने ही दारू जास्त दराने विकली जात आहे यावर कारवाई नाही बारामती मध्ये कोटयवधी रुपये खर्च करून प्रशासकीय भवन बांधले आहे या भवनात  प्रशस्त असे उत्पादन शुल्क विभाग कार्यालय आहे पण ते कधी उघडते हे कळत नाही कारण येथे येणार नागरिक जिना चडुन वर आल्यावर बंद असलेलं कार्यालय पाहून संतप्त होत आहे तक्रार करायला जावं कुठं दखल कोण घेणार त्यापेक्षा तक्रार करून काय उपयोग होत नाही अश्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.ही दारू कुणी स्वतःच बनवितोय तर कुणी बारामती,नीरा, जेजुरी,सासवड मधून आणून विकतात.असो, सद्या तरी गटारी अमावस्याच्या दारुड्याना शुभेच्छा द्यावे असे वाटते.

No comments:

Post a Comment