काय ती गाडी.! काय ते डोंगार.!!काय ते सर्कल-तलाठी.!!! समथं कसं ओके ओके हाय.!!!! बारामती:- बारामती तालुक्यातील असे काही गावे आहेत की त्यागावात डोंगर, टेकडी आहे जिथे अवैध मुरूम उत्खनन होत आहे अश्या ठिकाणी ट्रक, हैवा,ट्रॅक्टर मधून अवैध मुरूम वाहतूक होत असते मात्र या भागातील सर्कल व तलाठी मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे, तक्रारी केल्या तरी याकडे लक्ष देत नाही की मोबाइल वर फोन केला की तो एक तर बंद असतो किंवा जाणून बुजून उचलला जात नाही असे स्थानिक लोक बोलताना सांगतात, त्यामुळे तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही कारण उत्खनन करणारा म्हणतो आमचे काहीच *** होणार नाही,का तर सगळं कसं ओके ओके हाय! त्यामुळेच वाहतूक करणारी काय ती गाडी.!काय ते उत्खनन झालेले मुरूमाचे डोंगार.!!काय ते त्या हद्दीतील सर्कल-तलाठी.!!!सगळं कसं ओके ओके हाय.!!!! असे आवर्जून म्हणण्याची वेळ आली असल्याची येथील स्थानिक रहिवाशी बोलताना कळत आहे.तर तहसीदार व प्रांत अधिकारी लक्ष देतील का?हे पाहावे लागेल.
Post Top Ad
Tuesday, July 26, 2022
Home
ताज्या घडामोडी
बारामती
काय ती गाडी.! काय ते डोंगार.!!काय ते सर्कल-तलाठी.!!! समथं कसं ओके ओके हाय.!!!!
काय ती गाडी.! काय ते डोंगार.!!काय ते सर्कल-तलाठी.!!! समथं कसं ओके ओके हाय.!!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment