*संतांच्या उपकाराची परतफेड झाली पाहिजे - नंदकुमार झांबरे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 25, 2022

*संतांच्या उपकाराची परतफेड झाली पाहिजे - नंदकुमार झांबरे*

*संतांच्या उपकाराची परतफेड झाली पाहिजे - नंदकुमार झांबरे*

 फलटण (प्रतिनिधी) :- साधू संत हे परोपकारीच असतात, ते नेहमीच माणसांना जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवून एक प्रकारे उपकारच करत असतात. परंतू त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड झाली तरच मनुष्य जन्माचं सार्थक होईल असे मत संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांनी व्यक्त केले.
     संत निरंकारी मिशनच्या प्रमुख सदगुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने हनुमाननगर येथील सत्संग भवनात रविवारी (ता. २४) श्री. झांबरे यांच्या उपस्थितीत सत्संग सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख व्यासपीठावरून ते बोलत होते.
     या सत्संग सोहळ्यास दहिवडी सेक्टर संयोजक प्रमोद जगताप, फलटण शाखेचे मुखी अशोक लामकाने ज्ञानप्रचारक नवनाथ शेलार यांच्यासह फलटण, बारामती तालुक्यातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
    या जनसमुदयाला संबोधित करताना श्री. झांबरे पुढे म्हणाले,  संतांच्या मुखातून येणारी वचनं ही आमच्यासाठी लाभदायक असून आयुष्याला गतिमान देणारी असतात म्हणून त्यांच्या वचनाचे तंतोतंत पालन करत जीवन जगलं पाहिजे, 
    मागील संतांचं महत्त्व सांगताना श्री. झांबरे म्हणाले साधू संत हे परोपकारी असतात, स्वसुखाचा त्याग करून इतरांच्या जीवनात सुख प्राप्त करून देण्याचं महान कार्य करतात,
त्यांनी मनुष्याच्या कल्याणा साठीच आपला देह चंदनाप्रमाणे झिजविला आहे. म्हणून आम्ही प्रत्येकजण साधू संतांना मानण्याबरोबर त्यांच्या मुखातून येणाऱ्या अनमोल वचनांना देखील मानलं पाहिजे, तरच आमच्या जीवनामध्ये सुख, समाधान प्राप्त होणार आहे. असेही प्रवचनाच्या शेवटी सांगितले. 
     उपस्थितांचे आभार फलटण शाखेचे प्रचारक राजू भोई यांनी मानले तर मंचसंचालन प्रफुल्ल वाळवेकर यांनी केले.

No comments:

Post a Comment