तलवार व पिस्टल बाळगणाऱ्या दोघांवर बारामतीत दाखल झाला गुन्हा..कॉलेज परिसरात मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई कधी? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, July 18, 2022

तलवार व पिस्टल बाळगणाऱ्या दोघांवर बारामतीत दाखल झाला गुन्हा..कॉलेज परिसरात मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई कधी?

तलवार व पिस्टल बाळगणाऱ्या दोघांवर बारामतीत दाखल झाला गुन्हा..कॉलेज परिसरात मोकाट फिरणाऱ्या तरुणांवर कारवाई कधी?
बारामती:- बारामतीत सद्या गुन्हेगारी वाढत असून कॉलेज व शाळा परिसरात ही सर्वात जास्त वाढत आहे,रेल्वे उड्डाण पूल याठिकाणी मुलींचे हॉस्टेल आहे या परिसरात सतत तरुण युवक घोळका करून बसलेला असतो तर आज बाजू च्या दुकानात विनाकारण तरुण सतत बसलेले असतात व तर भरधाव वेगाने टू व्हीलर गाडी चालवीत येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची चेष्टा करीत असल्याचे अनेकांनी बोलुन दाखवले आहे, तक्रारी देखील झाल्या आहे पण गँगवर प्रऊतीच्या गुंड तरुण या परिसरात फिरत असतो याकडे लक्ष्य देऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे, नुकताच शहरातील रेल्वे ब्रिज परिसरात बेकायदेशीर रित्या विनापरवाना लोखंडी तलवार व पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना
शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून,किरण केशव अटक, वय.२३ वर्षे(रा.खामगाव, ता.दौंड, जि. पुणे), अजय बारकू गायकवाड,वय.२३ वर्षे (रा.चंदननगर, माळेगाव, ता. बारामती,
जि. पुणे) अशी अटक केलेल्या संशयित
आरोपींची नावे आहेत. विनापरवाना
शस्त्र बाळगल्याप्रकरणी शहर पोलीस
ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम
४,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. याबाबत पोलीस शिपाई
अकबर कादिर शेख, वय.३२ वर्षे यांनी
फिर्याद दिली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, शहर पोलीस
अंमलदार करे यांना बातमीदारामार्फत
माहिती मिळाली की, दोघेजण बारामती
रेल्वे ब्रिजजवळ दोन थांबलेले असुन
त्याच्या जवळ ओमनी गाडी क्र.
MH.14.AV. 4927 ही गाडी
संशयितरित्या थांबली असल्याची
माहिती मिळताच, शहर पोलिसांनी
त्याठिकाणी जात खात्री केली असता,पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची असमाधानकारक उत्तरे
दिल्याने, पोलिसांचा संशय अधिक
बळावल्याने त्यांच्या कडील गाडीची
पाहणी केली असता, गाडीच्या डिक्कीत
कापडी पिशवी मिळून आली,त्यामध्ये
एक तलवार व एक काळ्या रंगाचे
पिस्टल मिळुन आले.यामध्ये अंदाजे
५०० किमतीची लोखंडी तलवार व
अंदाजे १००० रुपये किंमतीचा पिस्टल
व अंदाजे ५० हजारांची ओमनी गाडी
असा ५१५०० रुपयांचा मुद्देमाल
पोलिसांनी हस्तगत केला आहे. या बाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

No comments:

Post a Comment