वसंतनगर भागात पिण्याच्या पाण्याचे हाल..भारतीय जनता पार्टी करणार आंदोलन... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, July 21, 2022

वसंतनगर भागात पिण्याच्या पाण्याचे हाल..भारतीय जनता पार्टी करणार आंदोलन...

वसंतनगर भागात पिण्याच्या पाण्याचे हाल..भारतीय जनता पार्टी करणार आंदोलन...                                                     बारामती:- बारामती शहरात विकास झाला असे म्हणतात हो झाला विकास पण तो कोणाचा हे सर्वसामान्य नागरिकांना माहीत आहे त्यांना विचारल्यास सांगतील असो, पण बारामती शहरातील उपनगरांमध्ये असणारे वसंतनगर व  गौतमनगर भागात सतत नेहमी पिण्याच्या पाण्याची बोंब असते ढिसाळ नियोजनाचा अभाव की हलगर्जीपणा यावरून दिसून येत आहे पुन्हा गेली दोन तीन दिवस झाले पिण्याच्या पाण्याची लेव्हल कमी झाली एक दोन हांडे पाणी मिळत असून लगेच पाणी बंद होत आहे यासाठी विचारणा केली असताना टोलवाटोलवीचे उत्तर मिळते, टाकीच भरली नाही, पंप बंद होता, घोटाळा झाला आहे असे कारणे अनेक वर्षांपासून येथील नागरिक ऐकत आले आहे,येथे होत असलेली लोकांची तारांबळ सकाळी कामावर जाण्याची घाई, मुलांना शाळेत जाण्याची घाई असताना ऐन वेळेस पाणी नसल्याने होत असलेली कुचंबणा नेहमीच बाब होऊन बसली आहेे, तसेेेच कॅनॉल ला केलेले सिमेंट कॉक्रीटीकरण मुळे  वसंतनगर व आजूबाजूच्या भागातील बोएअर ला पाणी कमी झाले आहे या साठी वारंवार सांगूनही दखल न घेतल्यास लवकरच बारामती नगरपरिषदे वर धडक मोर्चा काढणार असल्याचे या भागातील भारतीय जनता पार्टी बारामतीचे सचिव संतोष जाधव यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment