बारामती येथे ४ ऑगस्ट रोजी वनपरिक्षेत्र कार्यालयावर यशवंत ब्रिगेडचा मेंढ्या सहित मेंढपाळांचा मोर्चा
बारामती :-बारामती दौंड व इंदापूर तालुक्यातील मेंढपाळ समाज अनेक वर्षांपासून भटकंती करत आहे स्वतःची शेती नसल्यामुळे पुरेशा चाऱ्या अभावी आपले गाव सोडून गावोगावी भटकंती करून मेंढपाळी करणाऱ्या मेंढपाळ बांधवांवरती गेल्या अनेक दिवसांपासून बारामती तालुक्यातील स्थानिक शेतकरी व टवाळखोर व वनकर्मचारी यांचेकडून होणारे हल्ल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे, मागील काही दिवसांत पारवडी येथे लहान मुलीच्या डोक्यात दगड घालण्यात आला होता. म्हणजे विकृतीचा झालेला आहे, जणू काही माणुसकीचं संपली का काय असा प्रश्न पडतो. बारामती तालुक्यातील सुपा अभय अरण्य, व बारामती वनपरिक्षेत्रातील मेंढपाळ यांच्यावर वनकर्मचारी अन्याय करीत आहेत, मेंढपाळ, महिला, लहान मुले टार्गेट होत आहेत. तसेच बारामती ,सूपा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी मेंढपाळांची बकरी उचलून घेऊन जातात व पैशाची मागणी केली जाते, अशी मेंढपाळाची तक्रार आहे, महिलांना धमकावणे, अरेरावी शिवीगाळ करणे असे अनेक प्रकार सुरू आहेत. बारामती तालुक्यातील सुपा, उंडवडी, शिर्सुफळ, येथे इंग्रजांच्या काळापासून चरावू कुरणे राखीव होती. ती शोधून तेथे मेंढ्या चारण्यास परवानगी द्यावी. यापुढे मेंढपळांवरती खोटे गुन्हे दाखल केले केले.या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी वनपरिक्षेत्र पुणे बारामती विभाग, एमआयडीसी येथील कार्यालयावर यशवंत ब्रिगेड व मेंढपाळ यांचा मेंढ्या सहित गुरुवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. असे यशवंत ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष बापुराव सोनवलकर यांनी सांगितले, या निवेदनावर अहील्या सावित्री सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा डॉ अर्चना पाटील, संपतराव टकले, रासपचे तालुका अध्यक्ष adv अमोल सातकर, वसंतराव घुले, माणिकराव काळे, पाटस गावचे माजी सरपंच संभाजी खडके, गणेश कोळपे, संभाजी शिंदे,इत्यादींच्या निवेदनावर सह्या आहेत.
No comments:
Post a Comment