संतांच्या संगतीनेच मनुष्याचा उध्दार होतो - महादेव शिंदे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, July 24, 2022

संतांच्या संगतीनेच मनुष्याचा उध्दार होतो - महादेव शिंदे*

*संतांच्या संगतीनेच मनुष्याचा उध्दार होतो - महादेव शिंदे*
     बारामती (प्रतिनिधी) :- या विज्ञान युगात माणसाला जगण्यासाठी भौतिक साधनं भरपूर आहेत. परंतू मिळालेल्या  मनुष्य जन्माचं उद्धार होण्यासाठी त्याला साधू संतांच्या संगतीची गरज असल्याचे प्रतिपादन संत निरंकारी मिशनचे ज्ञान प्रचारक महादेव शिंदे यांनी केले.
     सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली काटेवाडी येथील  श्री. छत्रपती हायस्कूल च्या व्हरांड्यामध्ये शुक्रवारी (ता. २२) संत निरंकारी मिशनचा विशाल सत्संग सोहळा आयोजित केला होता. या प्रसंगी श्री शिंदे बोलत होते.
   या सत्संग सोहळ्यास बारामतीसह इंदापूर तालुक्यातील निरंकारी अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी बारामती शाखेचे संचालक शशिकांत सकट यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
     काटेवाडी येथे गेली चार ते पाच वर्षपासून निरंकारी मिशनचा साप्ताहिक सत्संग सुरू होता. परंतू मध्यंतरी कोरोना कारणाने अडीच ते तीन वर्षे याठिकाणी सत्संग होऊ शकला त्यामुळे येथील निरंकारी अनुयायी या सत्संगापासून वंचित झाली होती. येथील स्थानिकांना या सत्संगचा लाभ मिळावा म्हणून या सत्संगाची सुरुवात श्री महादेव शिंदे (ज्ञान प्रचारक) यांच्या अध्यक्षतेखाली आली. अशी माहिती येथील निरंकारी मिशनचे प्रचारक आनंद भिसे यांनी दिली. तसेच याठिकाणी दर शुक्रवारी सायंकाळी ७ ते ९ यावेळेत सत्संग होणार असल्याने भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ही श्री. भिसे यांनी केले. 
     उपस्थितांचे आभार भिसे यांनी  मानले तर मंच संचालन बाळासाहेब जानकर यांनी केले.

No comments:

Post a Comment