चळवळीचे ज्येष्ठ नेते काशिराम पैठणे यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचा यावर्षीचा पहिला बेस्ट जर्नालिस्ट राष्ट्रीय पुरस्कार... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 16, 2022

चळवळीचे ज्येष्ठ नेते काशिराम पैठणे यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचा यावर्षीचा पहिला बेस्ट जर्नालिस्ट राष्ट्रीय पुरस्कार...

चळवळीचे ज्येष्ठ नेते काशिराम पैठणे यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचा यावर्षीचा पहिला बेस्ट जर्नालिस्ट राष्ट्रीय पुरस्कार...                                           नवी दिल्ली:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या डेमोक्रॅटिक गटाचे राज्य संघटक व भारतीय कर्मचारी मजदूर युनियनचे राज्यउपाध्यक्ष ;मुंबईच्या साप्ताहिक अथांग वादळ या साप्ताहिकाचे कार्यकारी संपादक खारघर ग्रीन सिटी टाइम्स या सा.चे सल्लागार आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विचारवंत धम्म प्रचारक प्रसारक साहित्यिक देश-विदेशात धम्म प्रचाराचा वसा आणि वारसा जपण्याचे पवित्र कार्य करणारे आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते काशिराम पैठणे
साहेब यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचा यावर्षीचा पहिला बेस्ट जर्नालिस्ट राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी नवी दिल्लीचे राष्ट्रीय
अध्यक्ष डॉ. नफेसिंह खोबाजी दिल्ली व भारत नेपाळ दलित मैत्री संघ काठमांडू व बाबू जनजीवन राम का संस्कृती तथा साहित्य अकादमीचे आंतरराष्ट्रीय सचिव टी. एम. कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येष्ठ आंबेडकरी
चळवळीचे नेते काशीराम गोविंद पैठणे यांना बेस्ट जरनालिस्ट नॅशनल पुरस्कार प्रदान करण्यात आला आतापर्यंत काशीराम पैठणे यांनी देश-विदेशात आंबेडकरी चळवळीवरची अनेक आर्टिकल्स लिहिलेली असून प्रधानमंत्री
आणि राष्ट्रपती यांना व्यक्तिगत पत्र पाठवून अन्याय अत्याचार विरुद्ध लेखणीच्या माध्यमातून सामान्य माणूस गोरगरीब वंचित समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील कुठल्याही भागांमध्ये जातीय दंगली घडवून आणणा-या व्यक्ती,संस्थांचे चालक यांच्या विरोधात तीव्र लढा दिला व ग्रामीण पत्रकारितेचा वसा व वारसा नावा रुपाला आणला आहे. नवी दिल्ली येथे जंतरमंतर येथे संविधानाची प्रत जाळण्याच्या प्रकरणावरून आरोपीला कठोर आणि कठोर शासन झालं पाहिजे अशा प्रकारचे राष्ट्रपती प्रधानमंत्री यांना अर्ज लिहून सूचना
केल्या होत्या त्या सूचना अर्जाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गांभीर्याने विचार करून आरोपीला त्याचवेळी अटक केली होती. आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते काशिराम जी पैठणे यांनी भारत भर धम्म चळवळीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी देशविदेशातील मान्यवर व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत लुंम्बिनी नेपाळ येथे "धम्मरत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2021"प्रदान करण्यात आला होता. "आषाढी पौर्णिमेचे महत्व" व "भारतीय महिलांचे सबलीकरणाचे आद्य उद्धारक भारत रत्न डॉ बी आर आंबेडकर " हे
महत्वाचे लेख त्यांच्या अद्वैतीय लेख प्रसिद्ध आहेत. धम्मावर 2000वर काशिराम पैठणे यांना तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉ बी आर आंबेडकर यांच्या समतेच्या तत्वावर आधारित विचार भारतीय जनमानसात पोहचवण्यासाठी अहोरात्र झगडावे लागले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरची अनेक छोटी मोठी
सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय विचार त्यांना प्रस्तुत करण्याचा आणि समाजातील शिका संघटित व्हा संघर्ष करा हा बाबासाहेबांचा विचार तळागाळातील व्यक्तींना पोहोचवण्यासाठी सतत अग्रेसर राहणारे काशीराम पैठणे हे आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाले आहेत. आपल्या वृत्तपत्रीय क्षेत्रातील द्वितीय कार्याबद्दल हा
पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात येत असल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment