*स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “ हर घर तिरंगा ” उपक्रमा अंतर्गत घरोघरी राष्‍ट्रध्‍वज उभारणेबाबत जाहीर आवाहन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, July 19, 2022

*स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “ हर घर तिरंगा ” उपक्रमा अंतर्गत घरोघरी राष्‍ट्रध्‍वज उभारणेबाबत जाहीर आवाहन*

*स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत “ हर घर तिरंगा ” उपक्रमा अंतर्गत घरोघरी राष्‍ट्रध्‍वज उभारणेबाबत जाहीर आवाहन*
            बारामती:- बारामती शहरातील तमाम नागरिकांना जाहीर आवाहन करण्‍यात येते की, भारतीय स्‍वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्‍याच्‍या पार्श्‍वभुमीवर, जनतेच्‍या मनात या स्‍वतंत्र लढयाच्‍या स्‍मृती तेवत राहाव्‍यात, स्‍वातंत्र्य संग्रामातील घडलेल्‍या विविध घटना यांचे स्‍मरण व्‍हावे, स्‍वातंत्र्यासाठी चेतवलेले स्‍फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्‍तीची जाज्‍वल्‍य भावना कायमस्‍वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव अंतर्गत दिनांक ११ ऑगस्‍ट २०२२ ते १७ ऑगस्‍ट २०२२ या कालावधीमध्‍ये  “ हर घर तिरंगा ” उपक्रम राबविणे बाबत केंद्र शासन तसेच महाराष्‍ट्र शासनाच्‍या पर्यटन व सांस्‍कृतिक विभागाद्वारे सूचित करण्‍यात आलेले आहे. 
             त्‍याअनुषंगाने बारामती शहरातील प्रत्‍येक शासकीय/निमशासकीय कार्यालये, शाळा/महाविद्यालये, खाजगी संस्‍था यांनी आपल्‍या कार्यालयासमोर तसेच शहरातील प्रत्‍येक नागरिकाने आपआपल्‍या घरासमोर राष्‍ट्रध्‍वज उभारावा असे याद्वारे जाहीर आवाहन करण्‍यात येत आहे. राष्‍ट्रध्‍वज हे हाताने तयार केलेले अथवा मशीनद्वारे तयार केलेल्‍या सूत/पॉलिस्‍टर/लोकर/सिल्‍क किंवा खादी पासून बनविलेले असावेत. तसेच सदर कार्यवाही करत असताना भारतीय ध्‍वज संहितेचे पालन व्‍हावे व जाणते-अजाणतेपणी राष्‍ट्रध्‍वजाचा अपमान होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्‍यावी. 
               तसेच आपण उभारलेल्‍या राष्‍ट्रध्‍वजाचे तसेच इतर उपक्रमांचे छायाचित्रे, चित्रफिती, इ. केंद्र शासनाच्‍या amritmahotsav.nic.in या संकेतस्‍थळावर अपलोड करावेत. राष्‍ट्रध्‍वज उपलब्‍ध होत नसलेस बारामती नगरपरिषद (टेलि. नं. ०२११२-२२२४९४/२२२३०७) येथे संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment