सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे माजी उपकूल सचिव चंद्रकांत आढाव यांचे सुपुत्र डॉक्टर निलेश चंद्रकांत आढाव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित... नवी दिल्ली:-(विशेष प्रतिनिधी) देशाचे माजी उपपंतप्रधान स्वर्गीय बाबू जगजीवन राम यांच्या 36 व्या पुण्यस्मृतिदिनानिमित बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमीच्या वतीने राष्ट्रीय समर्पण दिनाचे आयोजन दिल्ली येथे 13 जुलै रोजी मुक्त धारा ऑडिटोरियम करण्यात आले होते यावेळी यावेळी पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची उपकुल सचिव सैवानिवृत्त चंद्रकांत आढाव यांचे सुपुत्र व वाघळवाडी सोमेश्वर नगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक निलेश चंद्रकांत आढाव यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला बाबूजी जीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकडेमीचे राष्ट्रीय अध्यक्ष खोबा यांच्या यांच्याशी वस्ती हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला त्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य बापूजी जीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी सचिव प्राध्यापक गोरख साठे याने तो पुरस्कार स्वीकारला यावेळी बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादनी आसाम राज्य प्रमुख हेमचंद्र बर्मन भारत नेपाळ दलित मैत्री संघ आंतरराष्ट्रीय सचिव टीएम कुमार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्याडेमोक्रॅटिक गटाचे राज्य संघटक जेष्ठ आंबेडकर विचारवंत काशीराम जी पैठणी ,सावता परिषद राज्य संघटक संतोष राजगुरु, डॉक्टर विद्युत चंद्र शहा, जिवेन चंद्रभयान, डॉ कुमारी गवळी, छबी रवी सरकार, कलकत्ता प्रसिद्ध नृत्यांगना आसाम स्वर्ग ज्योती चिटिया तसेच भारत नेपाळ दलित मैत्री संघ बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीचे राष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर आधीच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्राध्यापक निलेश यांना प्रदान करण्यात आला प्राध्यापक निलेश आढाव यांनी दलित चळवळीतील नेतृत्वावर 1950 ते 70 या कालखंडावर आधारित पीएचडीचा प्रबंध पुणे विद्यापीठाला नुकताच सादर केला आहे त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक
योगदानाची बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीने दखल घेतली असून बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमीच्या वतीने डॉक्टर बी आर आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार आम्ही त्यांना प्रदान करत
असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर नक्की यांच्या दिलेल्या पत्रकात म्हटले आहे मुगुटराव साहेबराव काकडे कॉलेजच्या व्यवस्थापन समितीचे चेअरमन सतीश भैय्या काकडे, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर देविदास वायदंडे सर्व प्राध्यापक
स्टाफ़ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने तसेच पुणे विद्यापीठ स्थित असणाऱ्या बुद्ध विहार आणि यशोधरा महिला शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश आढाव पुणे विद्यापीठातील सर्व निलेश आढाव यांचे मित्रपरिवार यांच्याकडून प्राध्यापक निलेश आढाव यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.आपल्याला हा पुरस्कार प्राप्त झाल्याने आपल्या जीवनामध्ये एक ऊर्जा प्राप्त झाले असल्याचे मत प्राध्यापक निलेश आढाव यांनी व्यक्त केले आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने
जीवनाची सार्थकता आणि भारतरत्न पुरस्कारापेक्षा हा पुरस्कार मला विशेष महत्त्वाचा वाटतो असे मत प्राध्यापक निलेश आढाव यांनी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आपले मत व्यक्त केले आहे. सर्व स्तरातून पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे सेवानिवृत्त उपकुल सचिव चंद्रकांता आढाव परिवार यांचे कडून प्राध्यापक निलेश आढाव यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक होत आहे साप्ताहिक लेखणीने वादग्रस्त न्यूज पोर्टलच्या वतीने प्राध्यापक निलेश
आढाव यांचे अभिनंदन आणि सहर्ष स्वागत
No comments:
Post a Comment