एक्सलेन्स अकॅडमीच्या वर्धापनदिना निमित्ताने पुस्तके वाटप...महापुरुषांचे चरित्र वाचून आदर्श नागरिक घडतील असा विश्वास.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, July 8, 2022

एक्सलेन्स अकॅडमीच्या वर्धापनदिना निमित्ताने पुस्तके वाटप...महापुरुषांचे चरित्र वाचून आदर्श नागरिक घडतील असा विश्वास..

एक्सलेन्स अकॅडमीच्या वर्धापनदिना निमित्ताने पुस्तके वाटप...महापुरुषांचे चरित्र वाचून आदर्श नागरिक घडतील असा विश्वास..

प्रतिनिधी :- काल दि ७ जुलै २०२२ रोजी बारामती मधील Excellence Science Academy चा ९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना ॲकॅडमीचे प्राचार्य मा. खोत सर यांच्या मार्गदर्शनाखाली महापुरुषांची पुस्तके दिली. ज्या मधे डॅा. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, आण्णाभाऊ साठे, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लाल बहादुर शास्त्री, डॅा ऐ पी जे अब्दुल कलाम, विनोबा भावे, अभ्यास कसा करावा?  रविंद्रनाथ टागोर, डॅा राजेंद्र प्रसाद, स्वामी विवेकानंद अशा थोर महापुरुषांची पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी बोलताना गौरव गुंदेचा यांनी सांगितले की, खरचं आज आगळ्यावेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम घेण्यात आला आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात नक्कीच फायदा होईल आणि त्याचे समाधान आम्हास नक्कीच राहिल. गेल्या ९ वर्षात आपण आम्हावर दाखविलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल आभार मानले.
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सदर कार्यक्रमासाठी दैनिक सकाळ पेपरचे विभाग प्रमुख मा. केळकर सर, स्पर्धा परिक्षा तज्ञ शेखर हुलगे सर, शेतकरी योद्धा चे योगेशजी नालंदे तर डॅा. नवनाथ मलगुंडे इ. मान्यवर उपस्थित होते.  प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment