खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे फॉर्म पोस्ट ऑफिसमध्ये स्वीकारणे सुरु...
पुणे(संतोष जाधव):- 31 जुलै 2022 पर्यंत भारतीय डाक विभागातर्फे प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे फॉर्म पुणे क्षेत्रातील पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यातील पोस्ट ऑफिसमध्ये स्वीकारण्याचे काम चालू आहे.
त्यासाठी जमीन असल्याचा पुरावा, बँक पासबुक, सात बारा उतारा ,आधार कार्ड इत्यादी दस्ताऐवज लागतील.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हे या पिक विमा योजनेचे उद्दिष्ट आहे.
या विम्यामध्ये भूस्खलन, गारपीट, ढगफुटी, नैसर्गिक आग आणि पूर यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्यास दावा मंजूर होतो तसेच पिक कापणीनंतर चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, आणि गारपीट झाल्यास विमा मिळतो. या दोन्ही परीस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत द्यावी लागणार आहे.
पिक विमा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 असल्याने त्याआधी शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल, श्री रामचंद्र जायभाये यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment