प्राईड ऑफ नेशन हा राष्ट्रीय पुरस्कार राजकुमार दिलीपराव पाटील यांना जाहीर..
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी दि. 25.07.2022 ):-नॅशनल युथ अवारडीज फेडरेशन ऑफ इंडिया भारत सरकार व विशाखा वेलफियर सोशिल फाऊंडेशन नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमान येत्या 12ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे" प्राईड ऑफ नेशन राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे अवारडीज फेडरेशन ऑफ इंडियाचे नॅशनल सेक्रेटरी व डॉ.
विशाखा वेलफियर सोशिल फाऊंडेशन नवी दिल्ली चे संस्थापक तसेच संत गाडगे बाबा विद्यापीठ अमरावती येथील महाराष्ट्र राज्य राज्यपाल नामीत सिनेट सदस्य डॉ. मनिष गवई यांनी अधिकृत निवड पत्रे देऊन देशातील
मान्यवर विशेष सामाजिक संस्था आणि वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा राष्ट्रीय युवा परिसंवाद आयोजित केला असल्याचे कळविले आहे. सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे
सरचिटणीस व युवा नेते राजकुमार दिलीपराव पाटील यांना प्राईड ऑफ नेशन अवार्ड प्रदान करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व विशाखा वेलफियर सोशिल फाऊंडेशनचे सचिव प्रा. गोरख साठे सर
बारामती यांनी मत प्रतिपादन केले आहे. महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या शुभहस्ते राजकुमार दिलीपराव पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे कळविले आहे. महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे बॅकेट हॉल मध्ये दि. 12 ऑगस्ट रोजी 3ते 6वेळेत सामाजिक
न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व मिझोरामचे माजी राज्यपाल अमोलीक रतन कोहली, आदी मान्यवर
उपस्थित रहाणार आहेत. राजकुमार दिलीपराव पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने सर्व स्तरातून
अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment