पुणे ग्रामीण विभागात पोस्टल कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी विशेष शिबीराचे आयोजन..
पुणे:- पोस्टल कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी आज दि 21.07.2022 रोजी कोविड लसीकरणासाठी (बुस्टर डोस) देण्यासाठीच्या विशेष शिबिराचे आयोजन श्री
शिवाजीनगर येथे करण्यात आले.सदर लसीकरण शिबिरामध्ये पुणे ग्रामीण विभाग, पुणे शहर पश्चिम विभाग,आर. एम. एस (बी) विभाग पुणे, पुणे शहर पूर्व विभागामधील कर्मचारी व त्यांचे
कुटुंबीय यांनी सहभाग नोंदवला. त्यात एकूण 163 बुस्टर डोस देण्यात आले.त्याचबरोबर खास इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खाते धारकांसाठी असलेल्या TATA AIG रु 399/- मध्ये रु 10 लाखाचा अपघाती विमा एकूण 41 व्यक्तींचा काढण्यात आला तसेच एकूण 15 व्यक्तींचे नवीन IPPB खाते उघडून त्यांना या विम्याचा लाभ
देण्यात आला.10 लाखांचा अपघाती विमा हा अत्यंत कमी रकमेत उपलब्ध आहे व त्यासाठी
IPPB खातेधारक असणे आवश्यक आहे तरी आजच जवळच्या पोस्टात जाऊन किंवा
पोस्टमनद्वारे IPPB खाते उघडून या अपघाती विम्याचा लाभ घेण्याचे आवाहन पुणे ग्रामीण विभागाचे अधीक्षक श्री बी पी एरंडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment