'ED' मुळेच सरकार आले..फडणवीसांनीच केले मान्य.!
मुंबई:- महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापत असताना एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केले या वातावरणात महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन
सध्या सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी विधानसभेत बहुमताचा ठराव घेण्यात आला. हा ठराव शिंदे - फडणवीस सरकारने जिंकला.बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या
अभिनंदनाच्या बोलताना प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरही टिका केली.यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
म्हटले की, विरोधक आरोप करतात की,ईडीमुळे नवीन सरकार आले आहे. मी सुद्धा तेच म्हणतो. ईडीमुळेच हे सरकार आले आहे,पण E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र.या ईडीमुळेच सरकार आले आहे.देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन, या त्यांच्या गाजलेल्या वाक्यावरही भाष्य केले. ते म्हणाले, मी पुन्हा येईन, अशी एक कविता मी म्हटली होती. त्यावरून विरोधकांनी माझी भरपूर टिंगल-टवाळी केली. मी पुन्हा आलो आहे, आणि येताना एकटा आलो नाही तर
यांनाही (शिंदे गटाला) घेऊन आलो आहे, असा
टोला विरोध पक्षांना लगावला,महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे सरकारकडून
विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला.
त्यानंतर 164 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या
बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे एकनाथ
शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
तर ठरावाच्या विरोधात 99 मतं पडली. त्यामुळे
विधानसभा अध्यक्षांनी सरकारने विश्वासदर्शक
ठराव मंजूर झाल्याची घोषणा केली.रविवारी भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर सभापती झाल्यामुळे शिंदे सरकारने पहिला अडथळा दूर केला आहे.गेले 10 दिवस चाललेल्या राजकीय नाट्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले आहे.यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत.
No comments:
Post a Comment