चक्क.. RTO अधिकाऱ्यालाच मागितली 1कोटी रुपयांची खंडणी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, July 9, 2022

चक्क.. RTO अधिकाऱ्यालाच मागितली 1कोटी रुपयांची खंडणी..

चक्क.. RTO अधिकाऱ्यालाच मागितली 1
कोटी रुपयांची खंडणी..
पुणे :- महाराष्ट्रात लाच घेणाऱ्याचे प्रमाण काही केल्या कमी होईना, रोजच कुणीनाकुणी शासकीय ,प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी लाच घेताना दिसून येत आहे, तर दुसरीकडे खंडणी मागणारे देखील वाढत आहे,अशीच घटना नुकतीच घडली,भावाने बनावट सही करुन गाडी विकल्याच्या प्रकरणात आरटीओ अधिकाऱ्यांना त्याने आरोपी केले. ही तक्रार मागे
घेण्यासाठी तुम्ही एक कोटी रुपये गोळा करुन
द्या, अशी खंडणी  प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केल्याचा प्रकार समोर
आला आहे. या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांवरील दोषारोप दाखल करण्यास लवकर परवानगी मिळावी, यासाठी त्याने सर्व अधिकाऱ्यांना ई मेल पाठविले असून त्यात राज्य घटनेबाबत अश्लिल आणि अवमानकारक भाषा वापरली आहे.बंडगार्डन पोलिसांनी  त्याला अटक केली आहे.:सचिन काशीनाथ गव्हाणे रा. राजगुरुनगर असे त्याचे नाव आहे.त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं.१८५/२२) दिली आहे.
हा प्रकार १० मे २०२१ ते २७ जून २०२२
दरम्यान घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी सचिन गव्हाणे याचा ट्रक त्याचा भाऊ समीर याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड  येथे
अर्ज करुन त्यावर सचिन याची स्वत:च सही
करुन कागदपत्रे सादर केली.सचिन याची गाडी विशाल टाव्हरे याच्या नावे करुन दिली.याप्रकरणी सचिन याने भोसरी एमआयडीसी फिर्याद दिली होती.त्यावरुन त्याचा भाऊ समीर व तसेच तत्त्कालीन सहायक परिवहन अधिकारी सुबोध मिर्चीकर व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला गेला आहे.याप्रकरणात पोलिसांनी तपास करुन परिवहन मुंबई आयुक्त यांच्याकडे दोषारोप दाखल करण्याची परवानगी बाबत प्रस्ताव सादर केला आहे.तो प्रलंबित आहे. याप्रकरणात सचिन याने वेगवेगळ्या कार्यालयामध्ये केलेल्या ई मेल व तक्रारी अर्जांमध्ये परिवहन अधिकारी व कर्मचारी विरुद्ध तक्रारी केल्या आहेत.सचिन गव्हाणे याने १ जून रोजी एक ईमेल फिर्यादी व अन्य सरकारी कार्यालयास पाठविले.त्यात त्याने राज्यघटनेबाबत अवमानकारक उल्लेख केला आहे.तसेच फिर्यादी यांच्याविषी बदनामीकारक व
अश्लिल मजकूर लिहिला आहे,त्यामुळे शेवटी शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार केली.पोलिसांनी IPC 385, 500, 34 सह राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रति अधिक 1971 कलम 2 सह IT Act 67 अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment