भरधाव डंपरने उडविले 17 ते 18 मेंढ्या,मन हेलावून टाकणारी घडली घटना,भरपाई दिला का मिटतो का प्रश्न? बारामती :- बारामतीत मन हेलावून टाकणारी भयानक घटना घडली भरधाव वेगाने
जाणाऱ्या खडी वाहतूक डंपरने(हायवा) 17 ते 18 मेंढ्या चिरडल्याची घटना शहरातील माळावरची देवी मंदिर लगत असणाऱ्या रिंग रोड वर इंदापूर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर घडली. यामध्ये मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपर(हायवा) (क्र. एमएच 11 सीएच 7511) च्या चालकाने बेफानपणे मेंढ्या चिरडल्या छिन्न विच्छिन्न अवस्थेत मेंढ्याचे अवशेष पडले होते तर काही मेंढ्यांच्या पोटातील पिल्लं देखील पोट फुटून बाहेर आली होती की ही घटना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मन हेलावून जात होतं याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती ह्या घटनास्थळी बारामती शहराचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांच्या पोलीस कर्मचारी यांनी
घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर वाहतूक
थांबवण्यात आली. संभाजी मोटे या
मेंढपाळाच्या या मेंढ्या होत्या,सुमारे 17 ते 18
मेंढ्या अपघातात चिरडल्याची माहिती
प्रत्यक्षदर्शनी दिली. घटनास्थळी मेंढपाळ
महिलेचा आक्रोश पाहुन उपस्थितांची मने
हेलावली.घटनास्थळी तातडीने समाजातील नेतेमंडळी पोहचले. मेंढपाळांना नुकसान
भरपाई मिळाल्याशिवाय डंपर नेऊ दिला
जाणार नसल्याची भुमिका घेतल्याने शेवटी अडीच लाख रुपयांचा चेक भरपाई म्हणून देण्यात आल्याचे खात्री झाल्यावर गर्दी कमी झाली मात्र भरपाई दिला म्हणून प्रश्न मिटत नाही तर काळ सोकावला नाही पाहिजे. बारामती नगरपरिषदआरोग्य विभागाचे राजेंद्र सोनवणे यांच्या टीम ने तात्काळ छिन्न विच्छिन्न झालेल्या मेंढ्यांच्या अवशेष उचलून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. पोलीसांनी येथे एकेरी वाहतुक
सुरु ठेवत पोलीस बंदोबस्त ठेवला होता.अपघातस्थळी बघ्यांची गर्दी वाढल्याने
वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता तो सुरळीत करण्यात आला.मेंढपाळास नुकसान भरपाई तसेच चालकांवर कारवाई करावी अशी मागणी होत होती. *ही घटना घडली त्या ठिकाणी मेंढ्या होत्या कदाचित याठिकाणी शाळकरी मुलं किंवा रस्त्यावर जाणारी माणसं असती तर काय झालं असतं, याची कल्पना देखील करवत नाही,वाहन चालविताना वाहनाचा वेग व ओव्हर लोड जड वाहन यामुळे गाडी कंट्रोल होत नाही आणि अशी घटना घडते याला जबाबदार कोणाला धरायचे?वारंवार ओव्हर लोड गाड्या रस्त्या वर वाहतूक करीत असतात,ज्या गाड्यावर नंबर दिसत नाही त्या नंबरची खाडाखोड केलेली असते अश्या गाड्या एकतर अवैध वाळू, रेती, मुरूम वाहतुक करीत असते यावर कारवाई का होत नाही हा एक संतप्त सवाल आहे.राजरोस पणे अश्या वाहणाऱ्या गाड्यावर कारवाई होणार का?असे चर्चा होऊ लागल्या आहे*
No comments:
Post a Comment