चक्क.. अटक न करण्यासाठी पोलीसानी 20
हजाराची घेतली लाच.. उस्मानाबाद :-एसीबीच्या कारवाईचा धडाका काही थांबेना कारण लाच घेणाऱ्याची संख्या वाढत असल्याने ही कारवाई होत आहे, अशीच कारवाई नुकताच झाली याबाबत माहिती अशी की, लोहारा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आरोपीकडून वीस हजार रुपये लाच घेताना पोलीस नाईक गोरोबा इंगळे याला उस्मानाबाद लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
उस्मानाबाद एसीबीने ही कारवाई गुरुवारी (दि. 4) सकाळी केली. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. लोहारा पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दरम्यान या गुन्ह्यात त्यांना अटक न करणे, लॉकअपमध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे यासाठी पोलीस नाईक गोरोबा इंगळे यांनी तक्रारदाराकडे बुधवारी
(दि.3) 25 हजार रुपये लाच मागितली होती.
तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले
होते. मात्र तक्रारदार यांना लाच देणे मान्य
नसल्याने त्यांनी उस्मानाबाद एसीबीकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करुन आज
(गुरुवार) सकाळी लोहारा-जेवळी रोडवरील
एका पेट्रोलपंप परिसरात एसीबीने सापळा
रचला.यावेळी पोलीस नाईक इंगळे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून वीस हजार रुपये लाच स्विकारली असता पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर
उगलमूगले, विष्णू बेळे, जाकेर काझी यांच्या
पथकाने केली.
No comments:
Post a Comment