नगररचना व विकास विभागातील सर्व्हेअरने 3 लाखाची मागितली लाच,एसीबीच्या जाळ्यात..
पुणे :- पुणे एसीबी ची धडाकेबाज कामगिरी चालू असून अधिकारीचे धाबे दणाणले आहे,कारवाईचा सपाटा चालू झाला असून नुकताच पुन्हा कारवाई झाली याबाबत माहिती अशी की, विकास योजनेचा अभिप्राय (डी. पी. ओपिनियन) देण्यासाठी 3 लाखाची लाच मागणाऱ्या पिंपरी -
चिंचवड महापालिकेतील नगररचना व विकास विभागातील सर्व्हेअर याच्यावर पुणे लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. संदीप फकीरा लबडे (वय - 48 ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सर्व्हेअरचे नाव
आहे. पुणे एसीबीने बुधवारी (दि. 3) दुपारी
दोनच्या सुमारास पालिकेच्या तळमजल्यावर
असलेल्या नगररचना विभागाच्या
कार्यालयातून संदीप लबडे याला ताब्यात
घेतले. या कारवाईमुळे अधिकारी आणि
कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नगररचना विभागातील सर्व्हेअर संदीप लबडे
याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 38 वर्षाच्या
तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार
पोलिसांनी 28 मार्च, 29 मार्च, 30 मार्च, 1 जुलै
आणि 19 जुलै रोजी पडताळणी केली होती.
तक्रारदार काम करत असलेल्या कंपनीचे
विकास योजनेचा अभिप्राय (डी. पी.
ओपिनियन) देणेसाठी प्रथम 3 लाख 50 हजार
रुपयांची मागणी केली होती.तडजोडीअंती 3 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता संदीप लबडे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.बुधवारी (दि. 3) दुपारी दोनच्या सुमारास लबडे याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे , पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर पोलीस हवालदार अयाचित, महिला पोलीस हवालदार वेताळ, पोलीस नाईक वैभव
गोसावी, पोलीस शिपाई दिनेश माने,
सौरभ महाशब्दे, चालक श्रीखंडे, वाळके, कदम,
पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment