तलाठ्याला 40 हजाराची लाच घेताना अटक..!बारामती देखील खातेनिहाय चौकशीची लवकरच मागणी.
सातारा/बारामती:- लाचखोरीचे प्रमाण वाढत असून विविध शासकिय निमशासकीय कार्यालयात लाच घेणारे वाढत आहे, कसलीच भीती न भाळगता खाजगी पंटर नेमून लाखो, हजारो रुपये लाच स्वीकारले जाते, याबाबतीत अश्या अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी करायला हवी, असे अनेक अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या पगारापेक्षा जास्त इनकम बाहेरून होतो, त्याचा शोध घेऊन अथवा माहिती घेऊन चौकशी व्हावी तरच कुठेतरी भ्रष्टाचार थांबण्यास काहीतरी फरक पडेल, नुकताच एका तलाठ्याला खरेदी केलेल्या प्लॉटची ऑनलाईन साता-बारा उताऱ्यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कराड शहरचा तलाठी सागर दत्तात्रय पाटील (वय 32, रा. कराड) याला लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने (एसीबी) अटक केली. दरम्यान, आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. याबाबत अधिक माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांनी प्लॉट खरेदी केला आहे. ऑनलाईन सात-बारा उताऱ्यावर नाव दुरुस्ती करायची असल्याने ते तलाठी सागर पाटील यांना भेटले. कामाचे स्वरूप ऐकल्यावर तलाठ्याने लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदार यांनी एसीबी विभागात जाऊन तक्रार दिली.एसीबी विभागाने पो.नि. विक्रम पवार यांनी तक्रार घेऊन पडताळणीसाठी पथक नेमले. दि. 8, 12 व 18 ऑगस्ट या तिन्ही दिवशी पडताळणी केली असता 40 हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. लाच मागितल्यानंतर मात्र तलाठ्याने ती पुढे स्वीकारली नाही. अखेर 29 रोजी कराड शहर पोलिस ठाण्यात लाच मागणीची तक्रार एसीबीच्यावतीने दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित तलाठी सागर पाटील याला एसीबीने अटक केली. एसीबीच्या कारवाईनंतर कराडमध्ये खळबळ उडाली.
दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात शासकीय
कार्यालयात, अधिकारी, कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एसीबी विभागाने केले आहे.अशीच काहीशी परिस्थिती बारामती मध्ये आहे पालखी महामार्गातील जमीन मोबदल्यात टक्के वारी घेतली जात असल्याचे कळतंय यामध्ये शेतकरी व जमीन मालकाला या मोबदला मिळविण्यासाठी कोणत्या कोणत्या विभागात जावे लागते तेव्हा तिथे होत असलेली लूटमार(ज्यादा पैसे)होताना नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहे, तळापासून वरपर्यंत आम्हाला या कर्मचारी व अधिकारी यांना कसा व कोनामार्फत रक्कम पोहच करावी लागते याचा पर्दाफाश लवकरच होणार आहे,परंतु प्रत्येक ठिकाणी लाच दिल्याशिवाय काम होत नाही हे लाच घेणारे यांची खातेनिहाय चौकशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना करणार असल्याचे देखील कळतंय.
No comments:
Post a Comment