खळबळजनक...महिला खेळाडूला आमिष दाखवून 50 वर्षाच्या व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार..
पुणे :-आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या
घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातच
पुण्यात एका महिला खेळाडूची आमिष दाखवून फसवणूक आणि लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडत तरुणी ही राष्ट्रीय खेळाडू असून तिने टिंडर डेटिंग अॅपवर एका 50 वर्षाच्या व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारली. यातून त्यांची मैत्री झाली आणि त्या
व्यक्तीने तरुणीला वेगवेगळी आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले.यासंदर्भात तरुणीने सांगितले की, ती एक राष्ट्रीय खेळाडू आहे.
तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करत आहे. तिने तिच्या मोबाईलमध्ये टिंडर डेटिंग अॅप डाऊनलोड केले होते. याच अॅपवरुन तिची
फसवणूक झाली. अॅप डाऊनलोड केल्यानंतर
आपल्या स्वत:च्या प्रोफाईलशी एक प्रोफाईल
मॅच होत असल्याने तिने एक रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाली. त्यांनी एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्या. आपले नंबर एकमेकांसोबत शेअर केले.यानंतर त्यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या.त्यानंतर पीडित तरुणीला त्या व्यक्तीने वेगवेगळी आमिष दाखवून तिच्याशी मुंबई आणि अन्य ठिकाणी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.मात्र ज्यावेळी पीडित तरुणीला समजले की आपण ज्या व्यक्तीला डेट करत आहोत तो 50 वर्षाचा पुरुष आहे. तसेच त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.डेटिंग अॅपवर ओळख झाल्यानंतर मैत्री अथवा प्रेम इथपर्यंत जाण्यापूर्वी त्या व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळवणे गरजेचे आहे.समोरचा व्यक्ती तो जी माहिती सांगतोय ती
खरीच असेल असे नाही.त्यामुळे त्याच्यावर लगेच विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची माहिती घेणे आवश्यक आहे. अन्यथा फसवणूक होण्याची शक्यता आहे.अशी अनेक प्रकरणे समोर आलेली आहेत.समोरची व्यक्ती आपण अविवाहित असल्याचे सांगतो मात्र प्रत्यक्षात त्याचे लग्न झालेले असते.काही महिन्यांच्या ओळखीत लाखो रुपये दिल्याच्या घटना देखील घडल्या असल्याचे
सायबर पोलीस सांगतात.तरी देखील काही महिला, तरुण मुली या मोहजाळ मध्ये फसतात हे बऱ्याच घडलेल्या घटनेवरून दिसत आहे.
No comments:
Post a Comment