9 ऑगस्ट क्रांती दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन..
बारामती:- क्रांती दिनाच्या आठवणी उजळ करण्यासाठी बारामतीतील सर्व नागरीकांनी दि. मंगळवार दिनांक ०९/०८/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता हुतात्मा स्तंभ वंदे मातरम् चौक (भिगवण चौक) बारामती या ठिकाणी उपस्थित राहावे.ब्रिटीशांची १५० वर्षे जुलमी राजवट आपले देशावर होती. या पारतंत्राच्या जोखंडयातुन जनतेला मुक्त करण्यासाठी सन १८५७ पासुन वासूदेव बळवंत फडके या आद्य क्रांतीकारकापासून अनेक विरांनी प्राणाची आहुती दिली आहे. १९४२ पर्यंत स्वातंत्र्य आंदोलनाची धार जनतेच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झाली होती. अनेक क्रांतीकारकांनी शसस्त्र उठाव केला. नेताजी
सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. प्रत्येक जन आपआपल्या विचाराप्रमाणे व
शक्तीप्रमाणे कार्यरत राहिले.दिनांक ०८ ऑगस्ट १९४२ हा दिवस एक आगळा आणि वेगळ्या घटनांनी जागतिक इतिहासात अजरामर झाला. त्या दिवशी मुंबई येथील गोवा लिया टॅक या मैदानावर अखिल भारतीय काँग्रेसची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अहिंसक आणि सत्याग्रही मार्गाने चळवळीचा विडा उचलेल्या पूज्य महात्मा गांधीनी "चलेजाव" (QUIT INDIA) हा निर्वारीचा इशारा ब्रिटीशांना दयावा लागला आणि त्याकरिता भारतीय जनतेला "करा किंवा मरा" (DO OR DIE) हा संदेश त्यांनी दिला त्यावेळी व्यासपिठावर पंडीत जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री सरदार वल्लभभाई पटेल इ. फार मोठे व्यक्तीमत्व उपस्थित होते. या संदेशाने भारतातील प्रत्येक नागरीक बालकापासून ते वृध्दापर्यंत महिला आणि पुरुष यांच्यात प्रत्यक्षपणे नेतृत्वाची निर्मिती झाली. कारण या चळवळीला मुळापासून स्वातंत्र्याची ज्योत, स्वातंत्र्याच्या ज्योतीचा मोठया आगीमध्ये समावेश झाला ही कल्पना ब्रिटीश सत्तेला सहन न झाल्याने ९ ऑगस्ट १९४२ रोजी पूज्य महात्मा गांधीजी आणि सर्व नेत्यांना अटक करून संपूर्ण देशात धरपकडीचे तंत्र अवलंबिले आणि लाखो जनांना बंधीवास बनविले म्हणुन या स्वातंत्र्याच्या क्रांतीचा उदय मुंबईच्या गोवालिया टॅकवर मिळाल्यानंतर या गोवालिका टॅकचे ऑगस्ट क्रांती मैदान असे नामकरण करण्यात आले याची आठवण म्हणून भारत सरकार प्रतीवर्षी ९ ऑगस्ट रोजी देशातील ठराविक स्वातंत्र्य
सैनिकांना दिल्ली येथे बोलावून राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्याची तसेच महाराष्ट्र सरकार या ९
ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानीत करून क्रांतीस्तंभला अभिवादन करतात.सन १९४२ साली मुंबई येथील (गोवालिया टॅक) ऑगस्ट क्रांती मैदान येथे भारत देश ब्रिटींशांच्या हुकुमशाहीमधुन मुक्त करण्याकरिता महात्मा गांधी यांनी चलेजाव, भारत छोडोचा नारा
दिला तो दिवस म्हणजे ९ ऑगस्ट रोजी संपुर्ण भारत देशात क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो.महात्मा गांधी यांनी भारत देशास सुराज्य मिळवुन दिले परंतु सुराज्याचे कसे निर्माण
होईल या त्यांच्या संकल्पना होत्या व त्यांचे सुराज्याचे स्वप्न अजुनही अपुर्ण राहिलेले आहे. ते पुरे करण्याकरिता नविन पिढीला सुसंस्कृत तयार करण्याकरिता आता हा क्रांती दिन साजरा करणे
गरजेचे झाले आहे व आपले भारतीय नागरीक म्हणून क्रांती दिन हा दिवस साजरा करणे अत्यंत
महत्वाचे आहे व ते आपले आद्य कर्तव्य आहे.
क्रांतीदिन हा दरवर्षी संपुर्ण भारत देशात भारत सरकार तर्फे साजरा केला जातो तसेच
बारामती येथे सुध्दा बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना क्रांतीदिन साजरा करत असतात.तरी बारामतीतील सर्व नागरीकांनी युवा विद्यार्थी-विद्यार्थीनी, व्यापारी, सर्व संस्थेचे
पदाधिकारी, सर्व शाळा, महाविद्यालय, मुख्याध्यापक, शिक्षक, पदाधिकारी सर्व संस्थेचे पदाधिकारी सरकारी निमसरकारी अधिकारी, बारामती नगरपरिषदेचे आजी माजी नगरसेवक, कर्मचारी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी क्रांतीदिन साजरा करण्याकरिता बारामती येथील हुतात्मा स्तंभ,वंदेमातरम् चौक (भिगवण चौक) येथे वार मंगळवार दि. ०९/०८/२०२२ रोजी सकाळी १०.००
वाजता न विसरता राष्ट्रीय पोषाखात हजर रहावे ही नम्र विनंती करण्यात आली,स्थळ आहे हुतात्मा स्तंभ वदेमातरम् चौक, (भिगवण चौक), बारामती.वेळ :- सकाळी १० वाजता.
दिनांक :- ०९/०८/२०२२ वार मंगळवार यावेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन निलेशभाई कोठारी-
बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व
बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना यांनी केले.
No comments:
Post a Comment