बारामतीतील नवीन रस्त्यावर पडले खड्डे, याला सार्वजनिक बांधकाम विभाग की बारामती नगर परिषद जबाबदार? - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 11, 2022

बारामतीतील नवीन रस्त्यावर पडले खड्डे, याला सार्वजनिक बांधकाम विभाग की बारामती नगर परिषद जबाबदार?

बारामतीतील नवीन रस्त्यावर पडले खड्डे, याला सार्वजनिक बांधकाम विभाग की बारामती नगर परिषद जबाबदार?                                                                                      बारामती :- बारामतीचा विकास झालाय असे म्हंटले जाते, करोडो रुपये खर्च देखील होतात मात्र काही महिन्यापूर्वी बारामती तालुक्यात व शहरामध्ये पालखीचे आगमन होणार होते यासाठी येणाऱ्या मार्गावर व शहरातील उपनगरांमध्ये रस्त्याचे तातडीने कामे केली तर काही ठिकाणी खड्डे बुजविले गेले पण त्या रस्त्याची काही महिन्यातच एकदोन पावसाच्या तडाख्यात रस्त्याची वाट लागली तर काही ठिकाणी खड्डे रस्त्यांना पुन्हा खड्डे पडले, रस्त्यांना खड्डे पडल्याने संबंधित  ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे होती, पण केवळ त्यापैकी तीन जणांनीच पैसे भरले आहेत.काही दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरवात होताच रस्त्यांना पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली, पुन्हा एकदा निकृष्ट काम समोर आले आहे. निकृष्ट रस्ते करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई का केली नाही की यामध्ये टक्केवारी सारखा प्रकार झाला का?असा सवाल नागरिक करीत आहे. कारण ठेकेदारावर कारवाई करण्याचा प्रशासनाला विसर पडला आहे.बारामती शहरात जलवाहिनी, मलवाहिनी, मोबाईल व इंटरनेट, विद्युतच्या सेवावाहिन्या यासह इतर कारणांनी झालेले खोदकाम, त्यानंतर ठेकेदारांकडून व नगरपालिकेकडून व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकृष्ट दर्जाचे काम करून रस्ते बुजविण्यात आले असल्याचे बोलले जात आहे, हे रस्ते खचल्याने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली.पहिल्याच पावसाळ्यात खड्डे पडले, रस्त्यांची चाळण झाल्याने वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग व बारामती नगरपरिषदेच्या व ठेकेदारांच्या कामाच्या कार्यपद्धतीवर टीका झाल्याने दोष दायित्व कालावधीतील  रस्त्यांना खड्डे पडल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात यावा. त्यासाठी प्रति खड्डा ५ हजार रुपये दंड निश्चित करावा.त्याचसोबत रस्त्यांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्यास त्रयस्थ संस्थेस सांगावे अशी मागणी सामाजिक संघटना करू लागली आहे.

No comments:

Post a Comment