धक्कादायक.. महिलेवर नाही तर आता तृतीयपंथीयावर अत्याचार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 13, 2022

धक्कादायक.. महिलेवर नाही तर आता तृतीयपंथीयावर अत्याचार..

धक्कादायक.. महिलेवर नाही तर आता तृतीयपंथीयावर अत्याचार..
जालना :- महाराष्ट्रात महिला अत्याचार दिवसेदिवस वाढतच चालली असल्याचे दिसत असताना चक्क विकृतीचा कळस गाठणारी एक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. स्त्रीवर नाही तर आता तृतीयपंथीयावर अत्याचार करण्यात आला आहे. या घटनेमुळे जालना जिल्हा हादरला आहे.तृतीयपंथीयावर दोन जणांनी अत्याचार केला. जालना जिल्ह्यातील मंठा बायपास उड्डाणपुलाखाली ही
धक्कादायक घटना घडली आहे. आतापर्यंत स्त्रीयांवर किंवा पुरुषांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या होता. आता तृतीयपंथीयावरही अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. आणि.... तुझ्या शिष्याला पकडून ठेवलं आहे. तू आल्याशिवाय सोडणार नाही असं सांगून तृतीयपंथीला आपल्यासोबत दोन जण घेऊन गेले. मंठा उड्डाणपुलाखाली त्यांनी तृतीयपंथीला आणलं आणि
अत्याचाराची परिसीमा गाठली. तृतीयपंथीयाला स्कूटीवर बसवून या दोघांनी उड्डाणपुलाखाली नेलं. तिथे दोघांनी बळजबरी केली. या
प्रकरणी पीडित तृतीयपंथीयाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

No comments:

Post a Comment