बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दहा किलोमीटर दौड आयोजन...
बारामती:- सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. हा अमृत महोत्सव साजरा करत असताना. लोकांमध्ये आरोग्य व्यायाम याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे. दहा किलोमीटर दौडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरची दौड 14 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजता तीन हत्ती चौकातून निघेल. सदरची दौड तीन हत्ती चौक भिगवण रोड ने साम्यक चौक रिंग रोड माळावरची देवी वाबळे हॉस्पिटल रिंग रोडने प्रशासकीय भवन फलटण चौक कसबा चौक देशमुख चौक सातव चौक टीसी कॉलेज मार्गे परत तीन हत्ती चौकात येईल. ज्या लोकांना पाच किलोमीटर दौड करायची आहे त्यांना सुद्धा भाग घेता येईल. सदर दौड मध्ये सर्व सहभागी लोकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तरी जास्तीत जास्त लोकांनी या दौडमध्ये सहभागी व्हावे असे पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे. या दौडमध्ये कोणतीही स्पर्धा नसून फक्त स्वतः विषय आरोग्याची जाणीव निर्माण व्हावी यासाठी याचे आयोजन केलेले आहे.
No comments:
Post a Comment