अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची विश्‍वास आरोटे यांना डॉक्टरेट पदवी पत्रकारांचे संघटन आणि सामाजिक कार्याचा गौरव... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 19, 2022

अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची विश्‍वास आरोटे यांना डॉक्टरेट पदवी पत्रकारांचे संघटन आणि सामाजिक कार्याचा गौरव...

अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची विश्‍वास आरोटे यांना डॉक्टरेट पदवी पत्रकारांचे संघटन आणि सामाजिक कार्याचा गौरव...
दिल्ली(प्रतिनिधी)-अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांना पत्रकारीता, संघटन आणि सामाजिक कार्यासाठी डॉक्टरेट पदवी युनिव्हर्सिटीचे चान्सलर डॉ.सँग ओन पार्क यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिल्ली येथे एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आली. गरीब कुटुंबात जन्म झाल्याने सुरुवातीला मिळेल ते काम करत, वृत्तपत्र वाटप करुन शिक्षण घेऊन पत्रकारीता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून राज्यभरातील विस्थापित पत्रकारांचे संघटन करुन त्यांच्या न्याय हक्कासाठी विश्‍वास आरोटे यांनी वीस वर्षांपासून चालवलेल्या प्रयत्नाची अमेरिकेतील नामांकित विद्यापीठाने दखल घेऊन त्यांचा गौरव केला आहे.
दिल्ली येथे 14 ऑगस्ट रोजी अमेरिका इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने भारतामधील विविध क्षेत्रात काम करणार्‍या चोवीस लोकांना डॉक्टरेट पदवी देऊन अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीने सन्मानित केले. यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांचा सन्मान करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातील विठे (ता.अकोले) येथे गरीब कुटुंबात जन्मलेल्या विश्‍वास यांनी जन्मगावातच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर राजूर येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने मिळेल ते काम करत शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात दारोदारी वृत्तपत्र विकून त्यांनी गुजरान केली. त्यातुनच वृत्तपत्र क्षेत्राशी नाळ जोडली गेली. एक रुपयाही भांडवल नसताना वृत्तपत्र सुरू करुन त्यांनी उत्तर महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली. पत्रकारीता करत असतानाच शहरी, ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्यभरातील पत्रकार व वृत्तपत्राशी संबंधित श्रमिकांचे मजबुत संघटन उभा केले. वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून पत्रकार संघटनेच्या व्यासपीठावरुन त्यांनी पत्रकारांच्या समस्या आणि वृत्तपत्रांचे प्रश्‍न सरकार दरबारी मांडून सोडवण्यासाठी संघर्ष केला आहे. पत्रकारांना अडचणीच्या काळात मदतीला धावून जात पत्रकारांमध्ये एक विश्‍वासाचे नाते निर्माण केले आहे. तर पत्रकार संघटनेच्या माध्यमातून राज्यभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून पत्रकार संघटनेला त्यांनी सामाजिक सेवेचा चेहरा दिला आहे. कोरोना काळात राज्यभर पत्रकारांना आणि अडचणीतील लोकांना किराणा कीटपासून ते रुग्णवाहिका, औषधोपचार यासाठी मदतीचा यज्ञच चालवला. दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात दिला.  या कार्याची अमेरिकेतील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने दखल घेऊन त्यांचा गौरव केला. त्याबद्दल पत्रकारांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सहकार्‍यांच्याच कामाचा गौरव-विश्‍वास आरोटे
पत्रकारीता करत असताना स्व. मुरलीधर बाबा शिंगोटे यांचा संपर्क आला आणि त्यांच्या सहवासाने या क्षेत्रात काम करण्याची ऊर्जा निर्माण झाली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे आणि प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्यामुळे पत्रकारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सामान्य पत्रकारांपर्यंत पोहचता आले. पत्रकार संघटनेतील पदाधिकार्‍यांच्या सहकार्यामुळेच आणि त्यांच्या कामामुळेच चांगले काम होत आहे. त्यामुळे अमेरिका युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट देऊन माझा गौरव केला असला तरी हा सहकार्‍यांच्याच कामाचा गौरव आहे अशी भावना विश्‍वास आरोटे यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment