बारामतीतील खुनाच्या घटनेचा मुद्दा अधिवेशनात घेतला अजितदादानी 'घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है'!.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 22, 2022

बारामतीतील खुनाच्या घटनेचा मुद्दा अधिवेशनात घेतला अजितदादानी 'घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है'!..

बारामतीतील खुनाच्या घटनेचा मुद्दा अधिवेशनात घेतला अजितदादानी 'घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है'!..
मुंबई :- बारामतीत अल्पवयीन मुले जास्त प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्रात वळाली आहे, कारण बारामतीत गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन मुले यांच्या कडून खून व खुनाचा प्रयत्न असे गुन्हे घडले आहे तर नुकताच घडलेल्या घटनेचे पडसाद थेट अधिवेशनात उमटले याबाबत माहिती अशी की,बारामती मध्ये मुलीची छेडछाड करणाऱ्या अल्पवयीन मुलांनी तिच्या
वडिलांचाच खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या नंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला आहे.यावेळी अजितदादा पवार यांनी 'घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है' असं स्टेटस ठेऊन खून केल्याचे नमूद केले. तसेच अशा अल्पवयीन आरोपींविरुद्ध कठोर
कारवाई करण्यासाठी उपाययोजना करावी अशी
मागणी त्यानी केली.अजितदादा पवार  म्हणाले, १७ ऑगस्टला पावसाळी अधिवेशनाला
सुरवात झाली आणि १८ ऑगस्टला शशिकांत
नानासाहेब कारंडे  हे मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेले असताना दोन ते तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले.ते मुलीसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडले, हे अतिशय भयानक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे.आणि या मुलाने थेट खून केला याच अल्पवयीन मुलाने यापूर्वी अशाचप्रकारे मुलीला त्रास दिला होता. तेव्हा तो १७ वर्षाखालील म्हणजे अल्पवयीन आहे म्हणून पोलिसांनी त्याला केवळ बोलवलं आणि वादासंदर्भात बाल न्यायालयासमोर हजर केलं. न्यायालयाने त्याला सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर मुलीचे वडील शशिकांत कारंडे यांनी मुलाला असं करु नकोस असं समजावून सांगितले. त्यानंतर पुन्हा काही गोष्टी घडल्या आणि त्या मुलाने त्यांचा खून केला, असं अजितदादांनी सभागृहात सांगितले.
'घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है' या गोष्टीच्या खोलात गेल्यावर असं लक्षात आलं की,संपूर्ण राज्यात या अल्पवयीन मुलांमध्ये असे संघर्ष होत आहेत. आरोपीने खून करण्यापूर्वी व्हॉट्सअॅप व इतर सोशल मीडियावर 'घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है' असं स्टेटस ठेवलं आणि मग खून केला.राज्यात अल्पवयीन मुलांवर वाढत्या सोशल मीडियाचा दुष्परिणाम होत
असल्याचे अजितदादा म्हणाले. अल्पवयीन मुलांना सोडून न देता कारवाई करा
व्हॉटसअॅपवर स्टेटस ठेवणं ,इंस्टाग्राम फेसबुक  इत्यादी सोशल मीडियाचा वापर वाढल्याने समाजातील अल्पवयीन मुलांवर याचा परिणाम होत आहे.त्यामुळे अल्पवयीन मुलांनी गुन्हा केला तर त्याला बालगृहात पाठवणे अथवा सोडून देणे,
असं न करता कडक कारवाई करावी लागेल.अन्यथा ही लहान मुंल म्हणून दुर्लक्ष केलं तर समाजात वेगळी परिस्थिती निर्माण होईल.
हीच घटना १८ ऑगस्टला बारामतीत घडली. याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी,
अशी मागणी अजितदादा पवार यांनी केली.

No comments:

Post a Comment