रेशन दुकानातून भेसळ युक्त तांदुळ वितरण विरोधात तहसीलदाराकडे तक्रार..
---------------------------------------------
मुरबाड (प्रतिनिधी) : - मुरबाड तालुक्यातील मौजे मोरोशी या गावात कांताराम पारधी हे चालवत असलेल्या रेशन दुकानातून जो तांदूळ वितरित करण्यात आला आहे, त्यामध्ये केमिकल मिश्रीत पावडरचा वापर करून नकली तांदूळ वितरण करण्यात येत आहे
तांदुळ पाण्यात टाकताच वितळून जातो असा तांदूळ रासायनिक पदार्थांपासून असावा व त्यापासून आरोग्यावर विपरीत परिणाम होतो असा समज व भीती गावातील नागरिकांत पसरली आहे सदर दुकानातुन गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व रेशन दुकानातील माल जप्त करून संबंधित दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच वितरित केलेल्या सेवन करू नये यासाठी शासनाने जनजागृती करावी
सदर बाबीवर गांभीर्याने त्वरित कायदेशीर कारवाई करावी अन्यथा
संयुक्त भारत पक्ष मुरबाड तहसीलदार कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे सदर तक्रारी संदर्भात मुरबाडचे नायब तहसीलदार श्री कर्वे यांना लेखी निवेदन देण्यात आले असून
तांदळाचे नमुने ही दिले आहेत या वेळी संयुक्त भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा अशोक बहादरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा विनोद साळवे, सचिव मा अनिल काळने, मुरबाड तालुका अध्यक्ष: मा मोहन भला, तालुका उपअध्यक्ष :लक्ष्मण निरगुडा ,गटप्रमुख: भास्कर गोपाळ भला, गटप्रमुख; फांगुळ गव्हाण, सोनू नवसु पोकळा ,तालुका कोषाध्यक्ष: कुंडलिक रामा खोडका , तालुका संघटक: जयसिंग कृष्णा खंडवी सह अनेक पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते,मुरबाड तहसीलदार श्री कर्वे यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
No comments:
Post a Comment