जिल्हाध्यक्षपदी रत्नप्रभा साबळे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची एकमताने निवड .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 27, 2022

जिल्हाध्यक्षपदी रत्नप्रभा साबळे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची एकमताने निवड ..

जिल्हाध्यक्षपदी रत्नप्रभा साबळे तर जिल्हा कार्याध्यक्षपदी रवींद्र सोनवणे यांची एकमताने निवड ..

बारामती:- येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीच्या जेष्ठ नेत्या श्रीमती रत्नप्रभा साबळे यांची पुणे रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी तर रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते व जिल्हा युवा सरचिटणीस रवींद्र सोनवणे यांची रिपब्लिकन पक्षाच्या युवा आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली.
     नुकतीच लोणावळा येथे रिपब्लिकन पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये वरील निवडी एकमताने करण्यात आल्या. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात क्रियाशील सभासदांची नोंदणी आढावा घेणे,  पक्ष बांधणीमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश करणे, पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी चर्चा करणे, पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवणे या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीला रिपब्लिकन पक्ष प्र जिल्हा सचिव सुनील शिंदे,  विजयराव डॅडी सोनवणे, मधुकर मोरे, संजय वाघमारे, सीमा चोपडे, पुनम घाडगे, सारिका बिराजदार यांच्यासह संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  जिल्ह्याची नूतन कार्यकारणी लवकरच जाहीर करणार असल्याचे नूतन जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी जाहीर केले तर रिपब्लिकन पक्षामध्ये युवकांचा सहभाग वाढवणे, युवक आघाडी शाखा स्थापन करणेस प्राधान्य देणार असल्याचे रवींद्र सोनवणे यांनी निवडीनंतर सांगितले तर रिपब्लिकन पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे व महिलांचा रिपब्लिकन पक्षामध्ये  सहभाग वाढवण्याचे काम आगामी काळात करू असे नूतन महिला जिल्हाध्यक्ष रत्नप्रभा साबळे यांनी निवडीनंतर सांगितले.

No comments:

Post a Comment