भांडणाचे रूपांतर,कुऱ्हाडीने वार करत एकाची हत्या..!
बारामती:- बारामती मधील वातावरण जरा वेगळ्याच दिशेला चाललेले दिसत आहे, चोऱ्या, मारामारी आणि आत्ता मर्डर याबाबत नुकतीचमिळालेली माहिती अशी की, दि.१८ ऑगस्ट रोजी सांयकाळच्या सुमारास भिगवण रोड नजीक बारामती येथील श्रीराम
नगरमधील जिजाऊ कार्यालय शेजारी सायंकाळी सुमारास एका व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करत हत्या करण्यात आली आहे. वादाचे रुपांतर भांडणात होऊन एका व्यक्तीवर कुऱ्हाडीने सपासप वार करण्यात आले. सदर व्यक्तीला बारामतीमधील सिल्व्हर ज्युबीली रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बारामती शहर पोलीस दाखल झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव शशिकांत बाबासो कारंडे आहे. मृत व्यक्ती हा फलटण येथील रहिवासी आहे. सदर प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहे. सदर घडलेल्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच घटना स्थळी पोलीस दल देखील दाखल झाली आहे.
No comments:
Post a Comment