हर घर तिरंगा’ ( घर घर तिरंगा ) उपक्रमास बारामतीत उत्तम प्रतिसाद - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

हर घर तिरंगा’ ( घर घर तिरंगा ) उपक्रमास बारामतीत उत्तम प्रतिसाद

हर घर तिरंगा’ ( घर घर तिरंगा ) उपक्रमास बारामतीत उत्तम प्रतिसाद 

बारामती-( प्रतिनिधी ):-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त बारामती तालुक्यात  ‘हर घर तिरंगा’ ( घर घर तिरंगा ) हा  उपक्रम १३  ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तालुक्यामध्ये हा उपक्रम विविध कार्यक्रम घेवून यशस्वीपणे राबविण्यात यावा, अशी सूचना बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांनी सर्व कार्यान्वयन यंत्रणांना दिल्या आहेत. 
स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सवा निमित्त  ' हर घर तिरंगा' ( घर घर तिरंगा ) उपक्रम राबविण्याबाबतच्या तयारीची बैठक बारामती तहसिल कार्यालयात नुकतिच आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विविध यंत्रणांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
विजय  पाटील  म्हणाले, सर्व शासकीय तसेच निमशासकीय विभाग प्रमुख व खाजगी आस्थापनांनी आपापल्या स्तरावर 'हर घर तिरंगा ' ( घर घर तिरंगा )हा उपक्रम १३  ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबवून तालुक्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रध्वज वाजवी किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत.  नागरिकांना राष्ट्रध्वज घरावर फडकविण्यासाठी प्रोत्साहित करावे. बारामती तालुक्याच्या मुख्यालयी ७५ फूट उंच राष्ट्रध्वज उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ते नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले. 
या कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयात वृक्षारोपण करण्यात यावे. तालुक्यातील पुरातत्वदृष्ट्या महत्वाची वारसास्थळे देखभाल करण्याकरिता ऐतिहासिक वारसा जपवणूक करणाऱ्या संस्थांना दत्तक देण्यात यावीत. शालेय, महाविद्यालय स्तरावरून विविध स्पर्धा, निबंध, वक्तृत्व,  चित्रकला स्पर्धां व  सांस्कृतिक कार्यक्रमाचे  आयोजन करण्यात यावे. शासकीय इमारतीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे बोधचिन्ह लावावे. या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. तालुक्याच्या मुख्यालयी संविधान स्तंभाची उभारणी करण्यात यावी व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाअंतर्गत सर्व कुटुंबांनी या उपक्रमात सहभागी होऊन तिरंगा ध्वज अभिमानाने आपल्या घरावर फडकवावा, असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले. 

चौकट  - 
घर घर तिरंगा उपक्रमास राष्ट्रीय तिरंगाध्वजाला बारामतीत चांगली मागणी - सागर खादी भांङार (झेंङा विक्रेते )
शासनाच्या घर घर तिरंगा या उपक्रमासाठी मान्यताप्राप्त खादीचे राष्ट्रीय तिरंगा ध्वजाला चांगली मागणी आहे ,यंदा मागणी जादा असल्यामुळे खादीचे पातळ व जाङ कापङा मधील विविध आकारातील तिरंगा ध्वज उपलब्ध आहेत विविध आकारा प्रमाणे दर ठरलेले आहेत,सध्या मागणी जास्त असल्यामुळे तिरंगा ध्वज कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत ,सागर खादी भांङार या दुकानात गेली ऐंशी वर्षा पासून ध्वजांची विक्री केली जात आहे, रास्त दरात उत्तम प्रतीचे मान्यताप्राप्त ध्वज विक्री केंद्र म्हणून सागर खादी भांङारचा पुणे जिल्ह्यात नावलैकिक आहे.१९४३ सालापासून स्वातंत्र्यपुर्व काळात पुणे जिल्हा मधील पहिले खादी भांङार ग्राहकांच्या सेवेत सुरु  आहे ,सध्या या खादी भांङारात तिसरी पिढी कार्यरत आहे, राष्ट्रध्वजाचा  सन्मान राखा , राष्ट्रप्रेम जागवा ,तिरंगाचा सन्मान राखा असे आवाहन सागर खादी भांङार झेंङा विक्रेते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment