बारामतीतील दहीहंडी आयोजकांना सूचना..
बारामती:-बारामती हे अतिशय सुसंस्कृत शहर आहे. या शहरात सर्व सण उत्सव जयंती अतिशय उत्साहाने सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होऊन साजरी करत असतात. त्यातच दहीहंडी हा सुद्धा उत्सव आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक ज्यांना पुणे मुंबई या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी जाणे परवडत नाही ते बारामती मध्ये दहीहंडी पाह ण्यासाठी येत असतात. आणि बारामतीचा नावलौकिक सर्व दूर करत असतात. तरी बारामतीतील आयोजकांना बारामती शहर पोलिसांतर्फे खालील प्रमाणे आवाहन करण्यात येत आहे.
1.दहीहंडीत लावणार येणारे पोस्टर गाणे यावरून कोणाच्याही धार्मिक भावना दुखवणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.
2.आसपासच्या परिसरात आपलेच नातेवाईक हे रुग्णालयात किंवा घरी आजारी असतात काही मुले अभ्यास करत असतात तरी त्यांना आपल्या डी जे चे उच्च आवाजाने त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी.
3.आजारी माणसाला रस्त्यावरून घेऊन जाताना आपल्याला ॲम्बुलन्स दिसते तिला आपण आदराने वाट करून देतो परंतु घरात आजारी असलेला पेशंटची साऊंड पोलुशीने काय अवस्था होत असेल याची सुद्धा आपण जाणीव ठेवावी व रुग्णांना सहकार्य करावे.
4.वाहतुकीला अनाठाही अडथळा निर्माण होणार नाही याचीही आपण सर्वांनी काळजी घ्यावी
5.दहीहंडी सुरू असताना पोलिसांनी काही कारणास्तव आवाज थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर तात्काळ थांबवावेत.
रायगडच्या समुद्रकिनारी स्वयंचलित हत्यारे सापडल्याने. मिरवणुकीमध्ये किंवा दहीहंडी मध्ये सर्वांनी सतर्कता बाळगावी. आपल्या आजूबाजूला कोणी संशयित ईसम असल्यास त्याला तात्काळ पोलिसांना कळवावे.
6.उत्सवाच्या धार्मिक स्वरूपाला कोणतेही गालबोट लागणार नाही याबाबतची सर्वांनी काळजी घ्यावी. दहीहंडीच्या सर्व बारामतीकर यांना हार्दिक
7.कायद्याचे व नियमाचे अधीन राहून सर्वांनी उत्सव साजरा करावा.
शुभेच्छा. !गोविंदा रे गोपाळा!
No comments:
Post a Comment