महिला पोलिसाला आमिष दाखवत अनैतिकसंबंध ठेवत,अर्धनग्न फोटो दाखवित बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार, पोलीसाला अटक..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 25, 2022

महिला पोलिसाला आमिष दाखवत अनैतिकसंबंध ठेवत,अर्धनग्न फोटो दाखवित बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार, पोलीसाला अटक..!

महिला पोलिसाला आमिष दाखवत अनैतिक
संबंध ठेवत,अर्धनग्न फोटो दाखवित बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार, पोलीसाला अटक..!
पुणे :-पुणे जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहे कुठे मुलींवर अत्याचार तर कुठे महिलांवर अत्याचार असे अनेक प्रकरणे घडत असताना आत्ता पोलीस महिलावर देखील अत्याचार होत असलेली घटना पुढे आली एका महिला पोलीस
शिपायाला लग्नाचे आमिष दाखवित शारीरिक संबंध ठेवले.तिला वारंवार मारहाण करुन जीवे
मारण्याची धमकी दिली. तिचे अर्धनग्न फोटो काढून मित्रांना दाखवून तिची बदनामी
केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडक पोलिसांनी एका पोलीस शिपायाला अटक  केली आहे. संदीप कुंडलिक जाधव असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.
सध्या तो पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२० पासून सुरु होता. याबाबत एका महिला पोलीस अंमलदाराने खडक
पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. २५३/२२) दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकत्र काम करीत असताना आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले.इतर मुलींशी अनैतिक संबंध ठेवून फिर्यादी यांच्यासोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली.त्यांना वारंवार मारहाण करुन मारुन टाकण्याची धमकी दिली.त्यांचे अर्धनग्न फोटो काढून ते मित्रांना दाखवून बदनामी केली.हे समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली असून पोलिसांनी संदीप जाधव याला अटक केली आहे.पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment