हद्दच झाली.. कुत्रीवर वारंवार बलात्कार तो ही ६५ वर्षाच्या वृद्धाकडून..!
राजगुरूनगर:- विकृतीचा कळसच गाठला महाराष्ट्रात नक्की काय चाललंय गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार अत्याचाराच्या घटना घडत असताना आत्ता तर हद्दच केलीय,मानवजातीला कलंक असणारी घाणेरडे लोक या जगात काय करतील याचा नेम नाही, नुकताच पाळलेल्या कुत्रीवर ६५ वर्षे वयाच्या वृद्धाकडून घरात कोंडून घेऊन वेळोवेळी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना खेड तालुक्यातील टाकळकरवाडी गावात उघडकीस
आली.भिवसेन धोंडीबा टाकळकर असे या विकृत वृद्धाचे नाव आहे. खेड पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.खेडचे पोलीस निरीक्षक सतिशकुमार गुरव यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर शहरालगत टाकळकरवाडी गाव आहे. गावाच्या एका वस्तीत आरोपी भिवसेन टाकळकर राहतो. त्याने रात्र झाल्यावर आणि आजूबाजूचे लोक झोपल्यावर राहत्या घरी पाळलेल्या कुत्रीला खायचे अमिष दाखवून घरामध्ये तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. कुत्रीला
आतमध्ये घेऊन दरवाजा तसेच वीज बंद करून हा व्यक्ती नेमके काय करतो म्हणून संशय आल्याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने खिडकीतून पाहिले. यानंतर याबद्दलची माहिती गावभर पसरली. दिवसासुध्दा वारंवार हा प्रकार होऊ लागल्याने काहीनी या घटनेचा मोबाईल वर व्हिडिओ तयार केला. त्यानंतर या प्रकरणाची गावभर चर्चा झाली.आतमध्ये घेऊन दरवाजा तसेच वीज बंद करून हा व्यक्ती नेमके काय करतो म्हणून संशय आल्याने त्याच्या
शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने खिडकीतून पाहिले. यानंतर याबद्दलची माहिती गावभर पसरली. दिवसासुध्दा वारंवार हा प्रकार होऊ लागल्याने काहीनी या घटनेचा मोबाईल वर व्हिडिओ तयार केला. त्यानंतर या प्रकरणाची गावभर चर्चा झाली.अखेर हा प्रकार पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने प्राणी मित्रांकडे सोपविण्यात आला. त्यांच्या मार्फत खेड पोलिसांत शनिवारी (दि. २७) उशिरा तक्रार दाखल करण्यात आली. आरोपी विरोधात क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक नवनाथ रानगट करीत आहेत.
No comments:
Post a Comment