महिलेने उत्तेजक कपडे घातल्याने लैंगिक छळाच्या तक्रारीचा गुन्हा दाखल होणार नाही- न्यायालय
केरळ :-लैगिंक छळाचे गुन्हे दाखल चे प्रमाणात वाढ झाली असून काही खोटे गुन्हे दाखल करतात असे अनेक घटनेवरून दिसत आहे, नुकताच केरळ उच्च न्यायालयाने लैंगिक छळाच्या एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्या सिविक चंद्रन यांचा अंतरिम जामीन मंजूर करताना ही टिपण्णी केली आहे.यावेळी भारतीय दंड संहितेच्या कलम 354A अंतर्गत स्त्रीने लैंगिक उत्तेजन वाढणारे कपडे परिधान केल्यास गुन्हा प्रथमदर्शनी अपील होत नाही. या प्रकरणी 74 वर्षीय आरोपीने जामीन अर्जासोबत महिलेचे फोटोही कोर्टात सादर केले.कोझिकोड सत्र न्यायालयाने आपल्या आदेशात असे निरीक्षण नोंदवले की, आरोपींनी जामीन अर्जासोबत काढलेल्या फोटोंवरून असे दिसून येते की, मूळ तक्रारदार महिलेने उत्तेजन वाढविणारे कपडे परिधान केले होते जे लैंगिक उत्तेजन वाढणारे होते. त्यामुळे प्रथमदर्शनी आरोपींविरुद्ध कलम 354A अंतर्गत गुन्हा दाखल होणार नाही. कलम 354 चा अर्थ आरोपीकडून महिलेला लज्जा वाटेल असे वर्तन करणे. तर कलम 354 A लैंगिक छळ आणि त्याच्या शिक्षेशी संबंधित आहे. यामुळे 354 लागू करण्यासाठी शारिरीक संकर्क आणि स्पष्टपणे लैंगिक छळ केल्याचे किंवा लैंगिक रंगावरून टिपण्णी, लैंगिक सुखाची मागणी केल्याबाबत भाष्य असणे आवश्यक असते.दरम्यान याप्रकरणी तक्रारदार महिलेने आरोप केला की, आरोपीने तक्रारदार महिलेचा तोंडी स्वरुपात शारीरीक पद्धतीने लैंगिक छळ केला आहे. तक्रारदार महिला एक लेखिका असून 2020 मध्ये नंदी समुद्रकिनारी आयोजित एका शिबारीमध्ये आरोपीने तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यानंतर कोयिलांडी पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 354A (2), 341 आणि 354 अंतर्गत
गुन्हा दाखल केला होता.यावेळी आरोपीच्या बाजूने वकील पी. हरी आणि सुषमा एम यांनी युक्तिवाद केला की, हा खोटा खटला आहे आणि बदला घेण्यासाठी त्याच्या काही शत्रूंनी अशाप्रकारे त्याच्याविरुद्ध बनाव केला आहे. तसेच या घटनेनंतर जवळपास 6 महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे कारण फिर्यादीने स्पष्ट करावे, असा युक्तिवादही करण्यात आला.तक्रारदाराने सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेले फोटो न्यायालयासमोर सादर करताना आरोपीच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, वास्तविक तक्रारदार महिलेने तिच्या प्रियकरासोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये समुद्रकिनारी ते दोघेही बसल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment