क्रांतीसुर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एसएससी व एचएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 3, 2022

क्रांतीसुर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एसएससी व एचएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ...

क्रांतीसुर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य वतीने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एसएससी व एचएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ...                                                                                   कुरवली:- क्रांतीसुर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य वतीने एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त एसएससी व एचएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ तसेच हेल्थ सल्लागार जगन्नाथ पारसी, प्रिस्टारन आयुर इंडिया लिमिटेड यांचे आरोग्य शिबिर घेण्यात आले. त्यासाठी प्रमुख पाहुणे माननीय अजित ठोकळे  (प्रदेश सचिव बीएसपी) माननीय गायक राहुल शिरसागर साहेब, माननीय राहुल सवाणे , माननीय राजाभाऊ झोडगे (माहिती अधिकारी व पत्रकार महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष) तसेच हेमंत जावीर (माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक बाबासाहेब सावंत या कार्यक्रमाचे आयोजक अनिल दणाने (क्रांतीसुर्य सामाजिक संघटना महासचिव) या कार्यक्रमाची प्रस्ताविका स्नेहा अनिल दणाने यांनी केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजित ठोकळे यांनी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मापासून समाजात वावरत असताना कोणकोणत्या अडचणी आल्या तसेच आपल्या वडिलांबरोबर मुंबईमध्ये आल्यानंतर काय हालाखीचे दिवस काढावे लागले कोणती कामे करावी लागली त्यातून संघर्ष करत एक साहित्यरत्न पुरस्कार कशाप्रकारे मिळवला याचे उदाहरण देण्यात आले याचप्रमाणे शालेय शिक्षणात आणि कंपन्यात झालेल्या खाजगीकरणाविषयी बोलण्यात आले आजही गावोगावी आपल्या महापुरुषांचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि आपली मुले मुली शिकल्या पाहिजेत त्याचबरोबर शिकून कलेक्टर इंजिनियर वकील झाल्या पाहिजेत हा संदेश येणाऱ्या पिढीला दिला या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय ज्येष्ठ नेते दिनेश काका पांढरे, माननीय रमेश चव्हाण (संभाजी ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष) माननीय विजय चव्हाण (भटक्या विमुक्त उमाजी नाईक संघटना तालुका कार्याध्यक्ष) माननीय संतोष कुंभार ,अशोक धोत्रे, संजय दनाने, ज्ञानेश्वर कोकरे, पोपट दणाने, अनिल बागाव आणि धनाजी गायकवाड तसेच कुरवली गावचे सरपंच व सदस्य सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment