*व्यावसायिक पायलट प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील भागवत आणि देवकाते यांची निवड*
पुणे:- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर या संस्थेमार्फत महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एकूण वीस विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाईंग क्लब नागपूर या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत मोफत व्यावसायिक पायलट प्रशिक्षण (कमर्शियल पायलट लायसन्स CPL) दिले जाण्याची योजना आहे. यावर्षी या प्रशिक्षणाच्या निव डीसाठी 12 जुलै रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती त्यामधून 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून यामध्ये पुणे जिल्ह्यातील भाग्याश भागवत आणि ऋतुंबरा देवकाते या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
20 विद्यार्थ्यांमध्ये इतर मागासवर्गांमधून 12, भटक्या जाती व विमुक्त जाती मधून 7 आणि विशेष मागास प्रवर्गातून 1 असे एकूण 20 विद्यार्थी निवडले गेले असून यात 50% (10 जागा) ग्रामीण भागातील उमेदवारासाठी राखीव आहेत.
व्यावसायिक पायलट प्रशिक्षणासाठी प्राप्त अर्जातून बारावीच्या गुणांकनुसार ( 1:30 या प्रमाणात ) 600 उमेदवारांना चाळणी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले. अंतिम निवडी साठी 150 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येऊन त्यामधून 20 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. असे निवड प्रक्रियेचे स्वरूप होते. पुणे जिल्ह्यातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार दि.१३/०८/२०२२ रोजी ठीक ११ वा. पत्रकार भवन, नवी पेठ,पुणे येथे झाला अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री चेतन शिंदे यांनी दिली.
20 विद्यार्थ्यांमध्ये विनय भांडेकर (गडचिरोली), पुष्पराज पाटील (औरंगाबाद), वैष्णवी उराडे (ब्रह्मपुरी, चंद्रपूर), भक्ती पाटील (नाशिक), प्रणव सावरकर (काटोल, नागपूर), प्रसाद गाडेकर (राहुरी, अहमदनगर), भाग्याश भागवत (वाघोली, पुणे), आदित्य मेहेरे (वडेगाव, बाळापुर, अकोला), तेजस बडवार (लासलगाव, निफाड, नाशिक), जयेश देशमुख (अमळनेर, जळगाव), प्रणव खोत (कवठे महाकाल, सांगली), अविनाश येरणे (गोरेगाव, गोंदिया), लखन सिंग परदेशी (जामनेर रोड, भुसावळ, जळगाव) अंकिता लोखंडे( सोलापूर), अंकिता गोसावी (शिरपूर, धुळे), स्वप्नील चव्हाण (औरंगाबाद), सतीश गिरी (नांदेड), ऋतुंबरा देवकाते ( पिंपळी,बारामती, पुणे), रोशन मराठे (मुल, चंद्रपूर), भूषण जुमळे (अमरावती).
No comments:
Post a Comment