शाहू हायस्कूलमध्ये चिमुकल्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा परिधान करून फोडली दहीहंडी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 18, 2022

शाहू हायस्कूलमध्ये चिमुकल्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा परिधान करून फोडली दहीहंडी..

शाहू हायस्कूलमध्ये चिमुकल्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा परिधान करून फोडली दहीहंडी..
 बारामती :रयत शिक्षण संस्थेच्या बारामती (ता.
हवेली) येथील श्री छत्रपती शाहू हायस्कूल व
ज्युनिअर कॉलेज (संचालित) डॉ. कर्मवीर
भाऊराव पाटील प्राथमिक विद्या मंदीर येथे
गुरुवारी (ता. १८) रोजी दहीहंडी फोडली.
शाहू हायस्कूल येथील छोटा, मोठा गट तसेच
पहिलीच्या वर्गातील चिमुकल्यांनी राधाकृष्णाची
वेशभूषा परिधान करून दहीहंडी फोडली. या वेळी पालक व शिक्षक उपस्थित होते. शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एन. पवार यांच्या मार्गदर्शनाखी हा उपक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. कर्मवीर भाऊराव
पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
कृष्णाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. शाहू
हायस्कूल मधील प्राथमिक शाळेत बालगोपालांनी
दहीहंडी फोडून गोकुळाष्टमीचा आनंद लुटला. या
वेळी राधा व श्रीकृष्णच्या वेशभुषेत अवतरलेल्या
विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.दरम्यान, विद्यार्थ्यांनी सादर केलेली गवळण व
कृष्ण जन्माच्या गीतांनी या कार्यक्रमाची रंगत
वाढविली. दहीहंडी फोडताच 'हाथी घोडा पालखी..जय कन्हैया लाल की...' च्या जयघोषाने शाळेचा परिसर दणाणून गेला. या वेळी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी शाळेतील शिक्षिका पी.डी खाडे यांनी कृष्ण
जन्माविषयी माहिती सांगितली. यावेळी जी. एम
तावरे, शिक्षिका पवार, ढवाण, देशमाने, गावडे
मॅडम उपस्थित होत्या. याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन
शाळेचे उपशिक्षक एन. ए. पवार यांनी केले तर
आभार गावडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment