*देश व समाज सुखी,समृद्ध व सुसंस्कृत घडण्यासाठी शिक्षण महत्वाचे - आ.अजित पवार*
बारामती:- आपला देश व समाज सुखी, समृद्ध व सुसंस्कृत घडण्यासाठी चांगल्या शाळा, कॉलेज उभे राहिले पाहिजेत आणि चांगला माणूस घडणेसाठी शिक्षण महत्वाचे असल्याचे मत राज्याचे विरोधी पक्ष नेते आ.अजित पवार व्यक्त केले.
शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए.इनामदार एकता इंग्लिश मिडीयम स्कूल ऍण्ड ज्युनइर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी आ.पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि मुस्लीम को-ऑप बँक लि. चेअरमन डॉ.पी.ए.इनामदार होते.
यावेळी बारामती ऍग्रो लि.चेअरमन राजेंद्र पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव शेख सुब्हानअली, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मा.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, आयएसएमटीचे अध्यक्ष किशोर भापकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हाजी सोहेल खान, बारामती बँकेचे ज्येष्ठ संचालक ऍड.गिरीष कुलकर्णी इ. मान्यवर उपस्थित होते.
बिलगेटस्चे उदाहरण देत पुढे बोलताना श्री.पवार म्हणाले की, गरिबीत जन्म घेतला म्हणून शिक्षण न घेता चालणार नाही उलट शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात ज्ञान संपादन केल्यास तो जगतावर राज्य करू शकतो. पी.ए.इनामदार यांची जबरदस्त शिक्षण संस्था आहे. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर अशा संस्थांना महाराष्ट्रामध्ये तोड नाही. प्रत्येकाने दर्जा राखण्यासाठी उत्तम प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. शैक्षणिक चळवळ यशस्वी करण्यासाठी शाळा, शिक्षक, विद्यार्थी व चांगले पालक यांचे सहकार्य मोलाचे असते. महात्मा फुले, कर्मवीर आण्णा इ. सारख्या बहुसंख्य महापुरूषांनी सुद्धा शिक्षणाचे महत्व व त्याची ताकद दाखवून दिली आहे. शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे ते पिल्यावर गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. शिक्षणामुळे चुक किंवा बरोबर कळते न्याय व अन्यायाविरोधात लढण्याचे बळ मिळते असेही ते म्हणाले.
बारामतीत मुस्लिम समाजासाठी महाराष्ट्रात नसेल असा शादीखाना बांधत आहोत. बारामतीसह जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने बदलण्याचे काम करत आहोत. राज्य सरकार वर बोलताना ते म्हणाले आजतगायत खातेवाटप करता आले नाही. कुटं घोडं पेंड खातय कळत नाही असाही टोला त्यांनी लगावला. यशवंतराव चव्हाण यांनी जो मंगल कलश आणला तेव्हापासुन म्हणजे 1960 पासुनअसे कधी घडले नाही ते राज्याच्या राजकारणात घडले व पहावयास मिळाले याची नोंद सुज्ञ नागरीकांनी घेतली पाहिजे.
आपल्या देशात पहिली मुलींची शाळा सुरू झाली तर मुलींना सक्तीची शाळा सुद्धा महाराष्ट्रात राबविण्यात आली. राईट टू एज्युकेशन आणले. येणार्या काळात विद्यार्थी केवळ ज्ञानाने संपन्न होता कामा नये तर ज्ञानाने, गुणाने, विचाराने, कौशल्यानेव चारित्र्याने संपन्न झाला पाहिजे. शाळेतील शिक्षकांना उत्तम प्रतीचे इंग्रजी बोलता आले पाहिजे इंग्रजी काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे आ.पवार म्हणाले की, समाजात वावरत असताना मुस्लीम मुलींना दर्जेदार शिक्षण दिल्यास इतक्या मुली मेरीटमध्ये येतात त्याबद्दल अभिमान वाटतो असेही ते म्हणाले. शिक्षणात स्पर्धा असली पाहिजे. पाहिजे त्याला शैक्षणिक परवानग्या मिळवून देऊ पण दर्जा घसरता कामा नये.
बारामतीतील नागरीकांसाठी विकास केला आहे. बारामतीकरांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे. रस्ता ओलांडताना विरूद्ध दिशेने जाऊ नये व कुठेही अतिक्रमण करू नये. या शाळेतून उत्तम दर्जेदार पिढी बाहेर पडावी व स्वत:च्या पायावर उभी रहावी शेवटी अशी आशा व्यक्त केली.
यावेळी शेख सुब्हानअली सर, हाजी सोहेल खान, प्रदीप गारटकर, डॉ.पी.ए.इनामदार इ. शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए.इनामदार एकता इंग्लिश मिडीयम स्कूल ऍण्ड ज्युनइर कॉलेजचे अध्यक्ष आलताफ सय्यद, उपाध्यक्ष परवेज सय्यद व सचिव सुबान कुरेशी यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान आ.अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे ओबीसींना आरक्षण मिळालेबद्दल त्यांना मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मुस्लिम बँकेच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हाचेअरमन व सदस्यांचा आ.अजित पवार यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. इमारतीचे बांधकाम करणारे डी.के.सिनकर, निकम व ज्यांच्या देखरेखीखाली या इमारतीचे काम झाले त्या नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम आलताफ सय्यद यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बारामती नगरपरिषदेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद यांनी केले. तर शेवटी आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुमैय्या मुलाणी यांनी मानले.
यावेळी बहुसंख्य नागरीक, विद्यार्थी, पालक, मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
No comments:
Post a Comment