अभिनव दहीहंडी संघाचा दहीहंडी सराव जोशात..!
बारामती:- गोविंदा पथकाच्या बारामतीतील सरावाच्या तयारीला वेग आला आहे.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर बारामतीतील गोविंदांची पंढरी अशी ओळख असलेल्या अभिनव दहीहंडी संघातील गोविंदांकडून मानवी
मनोरे रचण्यासाठी सरावाचा उत्साह
शिगेला पोहोचला आहे.कोरोनामुळे उत्सवांवर आलेल्या मर्यादांमुळे मागील दोन वर्षे गोविंदांच्या
मनोऱ्याच्या सरावाला ब्रेक बसला होता. यंदा, निर्बंध हटल्याने गोविंदांनी मोठ्या उत्साहात सरावाला सुरुवात केली आहे. 1990 मध्ये अभिनव दहीहंडी संघाची स्थापना झाली,
तेव्हापासून दरवर्षी पुणे जिल्ह्यात सर्वात
जास्त थर रचून आपला नावलौकिक वाढवला असून आपली ओळख यंदादेखील बारामतीसह पुणे जिल्ह्यात कायम ठेवण्यासाठी गोविंदा सज्ज आहेत.फिरता मनोरा ही या संघाची ओळख
असून, १५० ते २०० बालगोपाल या
संघात कार्यरत आहेत.यापूर्वी संघाने बारामती, दौंड, पुणे,नगर आदी परिसरातील मानाच्या हंड्या
फोडून नावलौकिक मिळवला आहे. याठिकाणी सरावासाठी एकत्र येतात. यासंघाची खासियत जो कोणी संघाचा अध्यक्ष होईल तो नगरपरिषदेचा नगरसेवक होतोच असे म्हंटले जाते,नारळ फोडण्याचा कार्यक्रम दरवर्षी पंचमीलाच केला जातो.. योगायोग येतो आणि त्यावेळेस दरवर्षी पंचमीच्या दिवशी कार्यक्रम होतो, गोविंदांचा सराव सुरू असून,सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जात आहे,त्यामुळे ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment