बापरे..अश्लील चाळे करत होता बारामतीतील शिक्षक तेही अनेक अल्पवयीन मुलींशी... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 18, 2022

बापरे..अश्लील चाळे करत होता बारामतीतील शिक्षक तेही अनेक अल्पवयीन मुलींशी...

बापरे..अश्लील चाळे करत होता बारामतीतील शिक्षक तेही अनेक अल्पवयीन मुलींशी...
भिगवण:- महाराष्ट्रात मुली व महिला सुरक्षित नाहीत हे अनेक घटनेवरून दिसत असताना धक्कादायक घटना घडली तीही एक-दोन नव्हे तर वर्गातील अनेक अल्पवयीन मुलींशी अश्लील चाळे करणाऱ्या एका नराधम शिक्षकाचे कारनामे उघड झाले आहेत. पुणे जिल्ह्याला हादरून सोडणाऱ्या या घटनेतील शिक्षकाला मुख्याध्यापिका आणि गट विकास अधिकारी
यांनी पाठीशी घातल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. जिल्हा परिषदेच्या भिगवणमधील प्राथमिक शाळेतील हा घृणास्पद प्रकार शरमेने मान खाली घालवणारा तेवढाच किळसवाणा आहे.बुधवार १७ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या भिगवण येथील प्राथमिक शाळेत अल्पवयीन मुलीशी या शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुरुवारी पालक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी शाळा गाठली तेव्हा संबधीत शिक्षकाचे यापूर्वीचे अनेक गैरकृत्य बाहेर पडले, धक्कादायक बाब म्हणजे ज्या सहावीच्या वर्गावर हा वर्ग शिक्षक होता, त्या वर्गातील मुली भयभीत अवस्थेत आहेत. काही मुलींनी तर त्याच्या कृत्याचा आढावा मांडला. यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे एप्रिल २०२२ मध्ये असाच एक प्रकार उघडकीस आल्यानंतर संबधित शाळेने त्याच्यावर कडक कारवाई करण्याऐवजी त्याच्याकडून माफीनामा लिहून घेत प्रकरणावर पडदा टाकला. एवढे घृणास्पद प्रकार या नराधमाकडून सातत्याने होत असतानाही
शाळा व्यवस्थापन मात्र मूग गिळून गप्प बसले होते.आजचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी पाठराखण करण्याचाच प्रकार सुरू होता. अखेर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्याध्यापिका वठणीवर आल्या. याबाबत माहिती अशी की, भिगवणमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत बारामती तालुक्यातील हा पदवीधर शिक्षक आहे. सध्या इयत्ता सहावीच्या वर्गावर वर्गाक्षिक म्हणुन कार्यरत आहे.त्याच्या वर्तणुकीचे प्रकार लक्षात आल्यानंतर त्याला खालचे वर्ग देण्यात आले; मात्र त्याने पुन्हा वरचा म्हणजे सहावीचा वर्ग मागुन घेतला होता, अशी माहिती पुढे येत
आहे.दरम्यान बुधवारी १७ ऑगस्ट रोजी त्याने त्याच्या सहावीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीशी वर्गातच अश्लील चाळे केले. ही गोष्ट मुलीने घरी सांगितल्याने याची वाच्यता झाली आणि पूर्वीच्या प्रकरणांनाही वाचा दरम्यान बुधवारी १७ ऑगस्ट रोजी त्याने त्याच्या सहावीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीशी वर्गातच अश्लील चाळे केले. ही गोष्ट मुलीने घरी सांगितल्याने याची वाच्यता झाली आणि पूर्वीच्या प्रकरणांनाही वाचा
फुटली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरुवारी सरपंच तानाजी वायसे, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, दत्तात्रय पाचंगणे, रामभाऊ पाचंगणे, पिंटू शेलार, अमितकुमार वाघ, दत्ता धवडे, तुषार क्षीरसागर आदीजण शाळेत पोहचले. दादा याचे सर्व कारनामे लक्षात घेता त्याच्यासह ह त्याला पाठीशी घालणाऱ्या मुख्याध्यापिका, गट विकास अधिकारी यांच्यासह सर्वांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी तातडीने शाळेत भेट दिली आणि एवढी मोठी घटना घडून पोलिसांना न कळविण्याबाबत जाब विचारला. अशा घटनेत पाठीशी घालणारेसुद्धा तेवढेच जबाबदार असतात याची जाणीव करून दिली, तेव्हा कुठे शाळा नरमली. यानंतर आता संबधित शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असुन, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.पेशाला काळिमा दरम्यान दादा याने शिक्षकी पेशाला काळिमा फासलाच आहे मात्र त्याच्या कृत्यावर सतत पडदा टाकण्यात आल्याने आणि बदनमीच्या भीतीने पालकांनी पोलिसात तक्रार देण्याचे टाळल्याने नराधम दादाचे धाडस दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यामुळेच की
काय छोट्या मुलींनीही त्याच्या कृत्याचा भांडाफोड केला.

No comments:

Post a Comment