भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे..
मुंबई :- महाराष्ट्र राज्यातील सत्तांतरानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मंत्री झाल्याने आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याची जोरदार चर्चा सुरु असताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत.त्या अनुषंगाने संघटन कौशल्य आणि अनुभवी अशाचीच प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. कालपर्यंत आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते मात्र आता बावनकुळे यांनी निवड करण्यात आली आहे. तर आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भाजपचे अध्यक्षपद देण्यात आले आहे.
की चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रुपाने भाजपला
प्रदेशाध्यक्ष मिळाले तर ओबीसी समाजामध्ये
देखील वेगळी भावना निर्माण होणार आहे.गेल्या काही दिवसांपासून बावनकुळे अॅक्टीव्ह झाले असून विरोधकांचे मुद्दे ते खोडून काढत आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने त्यांच्या जागेवर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली.मात्र आता या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार संजय कुटे यांचे नाव अचाकन चर्चेत
आले.त्यामुळे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची माळ
कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष
लागले होते. अखेर बावनकुळे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडली आहे.यामुळे सर्वत्र आनंद साजरा करण्यात आला आहे व योग्य निवड झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment