बारामती शहर पोलिसांनी दिले तीन गाईंना जीवनदान.
बारामती:- काल दिनांक 29 ऑगस्ट रोजी बारामती शहर पोलिसांना गोरक्षकामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की पिकप टेम्पो एमएच ४२ ए क्यू 40 13 पांढरा रंग यामधून काही गाई फलटण या ठिकाणावरून इंदापूरच्या दिशेने कत्तल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी बातमी मिळताच बारामती शहर पोलीस नी तात्काळ सदर बातमीवरून त्या पिकप चा पाठलाग केला व सदरचा पिकअप भरधाव वेगाने इंदापूर कडे जात असताना पिंपळी मॅप डोनाल्ड कंपनी जवळ पकडला असता त्या ठिकाणी दोन जर्सी व एक गावरान गाई कत्तलीसाठी घेऊन जात असताना अक्षय रामभाऊ वाघमोडे वय 25 वर्ष राहणार गोतंडी तालुका इंदापूर हा पिकप चालक व गणेश हनुमंत भोंग वय 29 वर्षे निमगाव केतकी तालुका इंदापूर हे सदरच्या गाई कत्तल साठी घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील एक गाई गाभण होती तरी सदरच्या दीड लाख रुपयांच्या गाई व पिकप टेम्पो अडीच लाख रुपये असा चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी त्या ठिकाणी जप्त केला व तीन गाईंना जीवनदान दिले सदरच्या गाई नंतर गो शाळेत पाठवण्यात आल्या सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक. प्रकाश वाघमारे, दशरथ कोळेकर कल्याण खांडेकर, बंडू कोठे, तुषार चव्हाण यांनी केली. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित कायदा कलम 5 ,9 प्रमाणे कारवाई केली तसेच प्राण्यांना छळवणुकीचा अधिनियम कलम 11 प्रमाणे सुद्धा कारवाई केली सदर गुन्ह्याचा तपास. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप काळे यांना वर्ग करण्यात आला आज सकाळी सदर आरोपी हे न्यायालयात हजर केले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी त्यांच्या पोलीस कोठडी साठी माननीय न्यायालयात युक्तिवाद केला आरोपींनी सुद्धा सदर गाई गाभण असून ती पाळण्यासाठी घेऊन जात आहे असा युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रदीप काळे यांनी उत्तमरित्या सरकारी अभियंता सोनवणे यांच्या मदतीने युक्तिवाद करून आरोपींचा युक्तिवाद करून खोडून काढला सदर आरोपींना माननीय न्यायाधीश पाटील मॅडम यांनी तीन दिवस पोलीस कस्तुरी रिमांड मंजूर केलेआहे. यामध्ये आणखी सुद्धा आरोपी निष्पन्न होणार आहेत.
No comments:
Post a Comment