बारामती मधून स्वयंस्फूर्तीने होणार आयर्नमॅन
बारामती :- जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर विविध क्षेत्रातील प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत कझाकिस्तान येथे होणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत बारामती तालुक्यातील सात युवक सहभागी होणार आहेत,स्वयंस्फूर्तीने आयर्नमॅन साठी गेली चार वर्षांपासून हे युवक सराव करीत आहेत डॉ वरद देवकाते, युसूफ कायम खाणी, अवधूत शिंदे, ओम सावळेपाटील, राजेंद्र ठवरे,विपुल पटेल व दिग्विजय सावंत हे आयर्नमॅन होण्यासाठी प्रत्यनाची पराकाष्टा करणार आहेत
कजाकिस्तान येथे 14 ऑगस्ट रोजी ही स्पर्धा होणार आहे प्रथमच स्वयंस्फूर्तीने आयर्नमॅन साठी बारामती मधून सात युवक भाग घेत आहेत या स्पर्धेत 65 देशातील स्पर्धेक सहभागी होत आहेत कोल्हापूर, पुणे नंतर आता बारामती मधून सर्वाधिक व एकत्रित स्पर्धक सहभागी होत असल्याने बारामती चे नाव जागतिक पटलावर होत आहेत
या स्पर्धे साठी कोल्हापूर, सातारा, पुणे व बारामती येथे धावणे, पोहणे व सायकलिंग साठी सराव केला.
या युवकांना जलतरण प्रशिक्षक महादेव तावरे, धावणे व सायकलिंग साठी कोल्हापूर येथील प्रशिक्षक पंकज रवाळु व पुणे येथील प्रशिक्षक बालरोग तज्ञ डॉ योगेश सातव यांनी विशेष प्रशिक्षण दिले तर आहार साठी डॉ नीता धामेजानी यांनी मार्गदर्शन केले. एकाच तालुक्यातील युवक एकाचवेळी वेळी आयर्नमॅन होण्याचा जागतिक विक्रम होणे साठी बारामती सायकल क्लब व सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत
चौकट :
स्पर्धे मध्ये मध्ये सलग चार किलोमीटर पोहेणे, 180 किलोमीटर सायकलिंग,त्यानंतर लगेचच 42 किलोमीटर धावणे असे तीन क्रीडा प्रकार असतात. आयर्नमॅन बनण्यासाठी हे तिने क्रीडा प्रकारांचे उद्दिष्ट सोळा तासात पार करावयाचे असते, प्रचंड मेहनत सराव व शारीरिक क्षमता यासाठी या साठी गरजेचे ठरते, तिन्ही क्रीडा प्रकारातील जागतिक खेळाडू सहभागी होत असतात.
No comments:
Post a Comment