बारामती वनपरिक्षेत्रातील पिंपळी येथील
वनक्षेत्रामधील अतिक्रमणधारकांवर कारवाई..
बारामती:- दिनांक : ०४-०८-२०२२ रोजी मा. श्री. एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक पुणे (भा. व. से.) व मा. श्री.राहुल पाटील,उपवनसंरक्षक पुणे (भा.व.से) यांच्या मार्गदर्शनाखाली मा.श्री.मयुर बोठे, सहायक वनसंरक्षक (म.व.से) श्रीमती.एस.डी. लोणकर, वनपरीक्षेत्र अधिकारी बारामती यांच्या नेतृत्वाखाली वनपरीक्षेत्र बारामती मधील मौजे पिंपळी फॉ. ग. नं. 338 मधील 13 अनाधिकृत पत्रा टपऱ्या, व 2 हॉटेल
पत्रा शेड चे 40 वर्ष जुने असलेले अनाधिकृपणे केलेले अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करण्यात आले.या वेळी वनपरीक्षेत्र कार्यालय बारामती येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर अतिक्रमण निष्कासित करत असताना मौजे पिंपळी गावचे सरपंच व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.आपणांस वनक्षेत्रामध्ये कुठेही काहीही अतिक्रमण करताना आढळून आलेस या कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक : 02112-244450 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन शुभांगी लोणकर,वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांनी केलेले आहे.
No comments:
Post a Comment