बारामतीत सावकारी कमी झालीच नाही.. व्याजाच्या पैशासाठी फसवणूक करत खरेदीखत करून परस्पर जमिनीचा व्यवहार करणाऱ्याखासगी सावकारावर गुन्हा दाखल..!! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 20, 2022

बारामतीत सावकारी कमी झालीच नाही.. व्याजाच्या पैशासाठी फसवणूक करत खरेदीखत करून परस्पर जमिनीचा व्यवहार करणाऱ्याखासगी सावकारावर गुन्हा दाखल..!!

बारामतीत सावकारी कमी झालीच नाही.. व्याजाच्या पैशासाठी फसवणूक करत खरेदीखत करून परस्पर जमिनीचा व्यवहार करणाऱ्या खासगी सावकारावर गुन्हा दाखल..!!
बारामती:- बारामती तालुक्यात व शहरात सावकारी काही केल्या कमी होत नसल्याचे अनेक तक्रारी पुढे येत आहे, अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहे, पूर्वीचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी खाजगी सावकारांच्या विरोधात मोहीम काढून चांगली मोहीम राबवली होती त्यावेळी चांगलेच सावकारांचे धाबे दणाणले होते,अशीच मोहीम पुन्हा एखादा राबविण्यात यावी तसेच अनेकांचे जमिनी बळकावली गेली आहे, तर काहींनी फसवून खुशखरेदी खत करून घेतली असून त्या जमिनी परत मिळवण्यासाठी धडपड आहे पण येथे न्याय मिळतो कुठे अशी प्रतिक्रिया उमटत आहे, याबाबत लवकरच जमिनी बळकावलेल्या सावकारांच्या विरोधात कर्जदार पीडितांना पुढे येऊन तक्रारी करण्यासाठी जनजागृती करणार आहे, तोपर्यंत अश्या सावकारांच्या विरोधात तक्रारी आल्यास टाळाटाळ करू नये अशी मागणी होताना दिसत आहे,नुकतीच बारामती तालुक्यातील जराडवाडी तील घटना पुढे आली आहे याबाबत माहिती अशी की,मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चामुळे
पैशाची गरज असल्याने खासगी सावकाराकडून घेतलेल्या पैशासाठी तारण म्हणून घेतलेल्या जमिनीचे साठेखत करून घेतो असे सांगत खरेदीखत करून घेत फसवणूक
केल्याप्रकरणी तसेच एक लाख मुद्देलेला वर्षाला तब्बल चाळीस हजार व्याज देऊनही अधिक पैश्याची मागणी करत तारण ठेवलेली जमीन परस्पर विक्री केल्याचा जाब विचारल्याने जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एकावर
बारामती तालुका पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ४२०,५०४,५०६,महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९, ४५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय
उत्तम बनकर (रा.जराडवाडी,ता.बारामती, जि. पुणे)असे गुन्हा दाखल झालेल्या खासगी
सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी छाया बाळासो जराड, वय. ५० वर्षे रा.जराडवाडी,ता.बारामती,जि.पुणे यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत तालुका पोलिसांनी दिलेल्या
अधिक माहितीनुसार, फिर्यादींच्या पतीने
सन २०१५ साली मुलीच्या लग्नात झालेल्या खर्चामुळे संशयित आरोपी बनकर यांचेकडून १,००,००० रुपये घेतले होते.या रक्कमेला वर्षाला ४०,००० रुपये व्याज असे ठरले असताना,यासाठी तारण म्हणून फिर्यादींच्या पतीच्या नावावर असलेल्या गट नं.३२५ मधील १७ गुंठे जागा साठेखतादवारे लिहुन देण्याचे ठरले होते. त्यानुसार २९ जुलै २०१५ रोजी
फिर्यादींच्या पतीने मध्यस्थीच्या माध्यमातून साठेखत करून दिले. फिर्यादी हे अशिक्षित असल्याने त्यांनी संशयित आरोपी बनकरवर विश्वास ठेवला. परंतु काही दिवसानंतर फिर्यादीच्या मुलांनी दस्त वाचल्यानंतर
संशयित आरोपींनी फिर्यादीकडून साठेखत करून घेण्याऐवजी खरेदीखत करून घेतल्याचे समजले. त्यावेळी फिर्यादींनी त्यास खरेदीखतावर
हरकत घेतली नाही. बनकर यांना व्याजाची रोख रक्कम ४०,००० दिले होते.त्यानंतर फिर्यादींची पैशांची अडचण असल्याने, त्यांनी बनकर यांना व्याज दिले नाही. त्यामुळे धनंजय बनकर यांनी व्याजासाठी फिर्यादीच्या नवऱ्याला हात पाय तोडत जीवेबमारण्याची धमकी दिली. त्यानंतर सन २०२२ ला बनकर यानी व्याजच्या
पैशांसाठी तगादा लावला. सन २०१६ पासुन आजपर्यंत सहा वर्षाचे ५ लाख व्याज मागितले, जर व्याज दिले तरच तुमची जमीन परत देईन असे म्हणल्याने,त्यावेळी फिर्यादींनी ठरल्याप्रमाणे व्याजाचे दोन लाख चाळीस हजार रूपये व मुद्दल एक लाख रूपये असे तीन लाख चाळीस हजार देण्यास तयार झाले असताना देखील,मला ५ लाख पाहिजेत असा अट्टहास बनकर यांनी धरला. तुम्ही जर पसे दिले नाही तर जागा
दुसऱ्या कोणाला तरी विकून टाकेल असे संगितले.त्यानंतर २८ जुलै २०२२ ला बनकर यांनी फिर्यादींची जमीन पाटोळे यांना विकली. फिर्यादींच्या पतीच्या अशिक्षितपणाचा फायदा
घेत,एक लाख रुपयांच्या मोबदल्यात फिर्यादीची १७ गुंठे जमीन साठेखत करून घेतो असे सांगुन खरेदीखत करून घेत फसवणूक केली असून,
जमिनीत विचारलं जेवणे बाबत विचारल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादींने फिर्यादीत म्हटले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास तालुका
पोलीस हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment