खून प्रकरणातील.. तीन अल्पवयीन मुलांनी खून केल्याचे निष्पन्न,झाली अटक..!
बारामती:- काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान श्रीराम नगर कवी मोरोपंत शाळेच्या समोर रोडवर शशिकांत बाबासो कारंडे वय 47 वर्ष यांची तीन इसमांनी धारदार हत्यारानी मानेवर डोक्यावर शरीरावर पायावर वार करून निर्गुण हत्या केली होती. याबाबत बारामती शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 379 /22 कलम भादवी 302 34 भारतीय हत्यार कायदा कलम 4 25 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद केला.सदर गुन्ह्यात बारामती शहर पोलिसांनी आज तीन अल्पवयीन सतरा वर्ष वयाच्या मुलांना ताब्यात घेतलेले आहे. सदर विधी संघर्ष ग्रस्त मुलांनी शशिकांत बाबासो कारंडे यांचा खून केल्याचे कबूल केलेले आहे. यातील विधी संघर्षग्रस्त बालक गणेश याचा मयत यांच्या मुलाशी. एका मुलीच्या मैत्रीवरून वाद झाला होता त्यावेळी सुद्धा. गणेश याने फिर्यादी यांच्या मुलावर मे महिन्यात हल्ला केला होता त्यावेळेस गणेश व त्याचा दुसरा साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते व बाल न्यायालयापुढे हजर केले होते. गणेश याच्या पालकांनी त्याला नंतर बालन्यायालयातून सोडून आणले होते. वरील ताब्यात घेतलेले तीनही अल्पवयीन मुले एकमेकांचे दोस्त असून सोशल मीडिया द्वारे एकमेकांना संपर्कात आहेत. यातील मयताचा मुलगा व तिन्ही अपचारी बालक एकाच शाळेत पूर्वी शिकलेली व पूर्वी एकमेकांचे दोस्त होते . परंतु मुलींच्या मैत्रीवरून त्यांच्यात वाद झाला यातील मयताचा मुलगा यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला व तो गणेश व त्याच्या मैत्रिणीच्या प्रेमामध्ये अडथळा निर्माण करतो असा गैरसमज त्यांनी करून घेतला. त्याला मयत हे सुद्धा पाठीशी घालत आहेत असाही गैरसमज करून घेतला. यातील मैदानी सुद्धा वडील कीच्या नात्याने त्यांना भांडण न करण्याबाबत एक दोन वेळा समजवले होते याचाही राग त्यांना होता.सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध होण्याची त्यांना हौस होती व श्रीराम नगर भागात त्यांचा वचक व्हावा असे कृत्य करावे व भविष्यात त्या ठिकाणी दबदबा निर्माण करावा असे सुद्धा एकंदरीत त्यांच्या सोशल मीडियाच्या. पोस्टवरून दिसून येते याच कारणास्तव त्यांनी. शशिकांत कारंडे यांचा भर वस्तीत भर दिवसा खून केला होता. असे निष्पन्न होत आहे. मयत काल त्यांच्या मुलीला घेण्यासाठी शाळेमध्ये आलेले होते त्या मुलीचा या घटनेची काहीही संबंध नाही ती फक्त या गुन्ह्यातील. प्रत्यक्षदर्शी घटना पाहणारी साक्षीदार आहे. सदर गुन्ह्याचा तपास करून सदर विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताबडतोब ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलिसांना दिले होते तसेच अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे हे तपासामध्ये शहर पोलीस ठाण्यास तळ ठोकून होते. वरील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश दंडिले, संकपाळ, वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, घोडके, पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर तुषार चव्हाण बंडू कोठे. यांनी तात्काळ विधी संघर्ष ग्रस्त बालकांचा वेगवेगळ्या टीम तयार करून शोध घेऊन त्यांना आज सायंकाळी ताब्यात घेतले आहे. वरील सर्व आरोपींची सोशल मीडियाची सखोल तपासणी सुरू आहे. या सर्व आरोपींवर रेगुलर कोर्टामध्ये खटला चालून शिक्षा होण्याबाबत पोलिसातर्फे पाठपुरावा केला जाणार आहे. सर्व पालकांना तसेच शिक्षकांना विनंती करण्यात येत आहे की अल्पवयीन मुलांचे सोशल मीडिया मॉनिटरिंग आपण सर्वांनी मिळून करायला आवश्यक आहे. अल्पवयीन मुला-मुलींचे इंस्टाग्राम फेसबुक व्हाट्सअप हे सर्व पालकांनी वेळोवेळी त्यांना विश्वासात घेऊन तपासणी करणे गरजेचे आहे. तसेच ज्या अल्पवयीन मुलांची कौटुंबिक वातावरण चांगले नाही अशा. मुलावर विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. पोलीस सुद्धा आता या बाबत सोशल मीडिया मॉनिटरिंग करणार आहेत.
No comments:
Post a Comment