*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन येथे प्रांताधिकारी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, August 13, 2022

*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन येथे प्रांताधिकारी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन येथे प्रांताधिकारी कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण*

बारामती दि. १३  :- भारतीय स्वातंत्र्याच्या  ७५ व्या  अमृत महोत्सवानिमित्त प्रशासकीय भवन, बारामती येथे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

याप्रसंगी तहसिलदार विजय पाटील,  उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे, निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार प्रतिभा शिंदे, अनिल ठोंबरे, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, महसूल व सर्व शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या  विद्यार्थांनी राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. प्रांताधिकारी कांबळे यांनी  सर्व उपस्थित मान्यवरांना भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.

                               

No comments:

Post a Comment