महिला डॉक्टरवर केला मॅनेजरने लग्नाचं आमिष दाखवत बलात्कार..!
पुणे :-महाराष्ट्रात महिला अत्याचाऱ्याच्या घटना काही केल्या कमी होईना, की कायदा कडक नाही असे म्हणावे लागेल, महिला झाल्या महिला पोलीस झाल्या आता महिला डॉक्टर वर सुद्धा अत्याचार होत असल्याने पिंपरी-चिंचवड हादरले.. शहरात लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. एका सेल्स मॅनेजरने बीएएमएस महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. नराधम सेल्स मॅनेजरने पीडित महिलेला एका सदनिकेत कोंडून ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.आरोपीने पीडितेला लग्नाचं आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिला डॉक्टरने आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अंजिम नूर मोहम्मद तांबोळी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात एका
सेल्स मॅनेजरने बीएएमएस महिला डॉक्टरवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचं आश्वासन देऊन सेल्स मॅनेजरने पीडित महिला डॉक्टरवर बलात्कार केला. सन २०१९ पासून ते २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत संत तुकाराम नगर येथील एका घरामध्ये आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला. महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार करू नये म्हणून पीडित महिला डॉक्टरला आरोपीने एका सदनिकेत कोंडून ठेवलं. या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेत पिंपरी
पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून अधिक तपास करीत आहे.
No comments:
Post a Comment