'वादग्रस्त' पोलीस निरीक्षक निलंबित, गृहमंत्री यांची विधानसभेत घोषणा...
मुंबई :- महाराष्ट्र राज्यात काही तालुक्यात गावात, शहरात अवैद्य धंदे वाढत असल्याचे कळतंय याच अनुशंगानेअंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फोफावलेली अवैध धंदे, गुंडगिरीकडे दुर्लक्ष करणे आणि बनावट दारुच्या कारखान्यावरील संशयास्पद कारवाई पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांना चांगलीच महागात पडली आहे. भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यातील बेबंद कारभाराबाबत लक्षवेधी दाखल केल्यानंतर वासुदेव मोरे यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत घोषणा केली.ग्रामीण ठाण्याच्या प्रमुख पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या सहेतुक दुर्लक्षामुळे सर्वत्र अवैध धंदे फोफावले आहेत. गुटखा, हातभट्टी, बनावट दारुची सर्रास विक्री वाढली. बेकायदेशीर क्लब, जुगार अड्डे सुरु असून गुंडांचा हैदोस वाढला आहे. ठाण्यात अवैध धंदेचालक, गुंड यांचा राबता असून त्यांना मोरे यांच्याकडून सन्मान तर सामान्य नागरिकांना मात्र दुय्यम दर्जाची वागणूक मिळत आहे. त्यांच्या काळात गैरप्रकारांवर एकही लक्षणीय कारवाई झाली नाही. उलट अनेक वादग्रस्त प्रकार त्यांच्या पोलीस ठाण्यात घडले आहेत.दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हे नोंदवले आहे.तसेच जप्त केलेला गुटख्याची परस्पर विक्री केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन झाले.एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेले गैरप्रकार ठाणेप्रमुख मोरे यांना माहिती नसावेत असे शक्य नाही,उलट त्यांच्या आशीर्वादामुळेच कर्मचारी गैरप्रकार करण्यास धजावत असावेत, अशी कुजबुज सुरु झाली होती. बनावट दारूच्या कारखान्यावरील कारवाई संशयास्पद मोरे यांनी 8 जुलै रोजी वरपगाव शिवारात बनावट दारूच्या कारखान्यावर छापा (Raid) मारून साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे दाखवले.परंतु, दुसऱ्या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने याच ठिकाणी छापा मारुन सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.आदल्या दिवशी पोलिसांनी छापा मारला असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाला पुन्हा मुद्देमाल कसा सापडला ?
मोरे यांनी आदल्या दिवशी फरार दाखवलेला मुख्य आरोपी एक्साईजच्या छाप्यावेळी त्या ठिकाणी होता हे देखील उघड झाले.
याशिवाय, मोरे यांनी जागा मालकाचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचाही आरोप झाला.
त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा आहे.आमदार नमिता मुंदडांची लक्षवेधी ग्रामीण पोलीस ठाण्यातील बेबंदशाही बद्दल नागरिक तक्रारी मांडू लागल्यानंतर आमदार नमिता मुंदडा यांनी याबद्दल पोलीस अधीक्षक, महासंचालक , गृहमंत्री यांना पत्र लिहिले.तसेच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भात लक्षवेधी मांडली.यानंतर पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कार्यवाही करत मोरेंची अंबाजोगाईतून उचलबांगडी करुन त्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले.आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोरे यांच्या निलंबनाची घोषणा केलीअसल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
No comments:
Post a Comment